चाहत्यांना ‘इश्क विश्क प्यार व्यार’ ने आकर्षित केल्यानंतर ‘इश्क विश्क रिबाउंड’ च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा दुसरा ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘सोनी सोनी’ शीर्षक असलेल्या या गाण्यात चॉकलेट बॉय रोहित सराफ आणि त्याची पार्टनर पश्मिना रोशन हे दोघे एकत्र दिसत आहे. पहिल्या फ्रेमपासूनच रोहितची इनेर्जी आणि किलर मूव्ह ने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. रोहितची पश्मीनासोबतची केमिस्ट्रीही कमालीची दिसतेय.
रोमँटिक मध्यभूमिकेत म्हणून ‘इश्क विश्क रिबाउंड’ हा रोहितचा पहिला चित्रपट आहे. ‘सोनी सोनी’ या गाण्यासह, रोहितने त्याला नॅशनल क्रश का म्हटले जाते हे सिद्ध केले आहे. हे गाणं दर्शन रावल, जोनिता गांधी आणि संगीतकार रोचक कोहली यांनी गायले आहे.
[read_also content=”झाडे लावण्याचा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टीजर लाँच! https://www.navarashtra.com/movies/teaser-launch-of-the-film-zhad-which-gives-the-message-of-planting-trees-537706.html”]
जेव्हापासून हा ट्रॅक सोशल मीडियावर आला आहे तेव्हापासून, चाहते ‘इश्क विश्क रिबाउंड’बद्दल उत्साह व्यक्त करत आहेत आणि आकर्षक आणि संस्मरणीय कामगिरी देण्याच्या रोहितच्या सातत्यपूर्ण क्षमतेबद्दल त्यांचे कौतुक करत आहेत. जसजसा ‘इश्क विश्क रिबाउंड’ 21 जूनला रिलीज होणार आहे, तसतसे या निपुण अविनाश धर्माधिकारी-दिग्दर्शित रोम-कॉम भोवती उत्साह निर्माण होत आहे.
‘इश्क विश्क रिबाउंड’ च्या पलीकडे, रोहित ‘मिसमॅच्ड ३’ मध्ये त्याचे लाडके पात्र ‘ऋषी सिंग शेखावत’ पुन्हा साकारणार आहे. तसेच तो धर्मा प्रॉडक्शनचे ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ यामध्ये देखील दिसणार आहे. रोहितचा हा पहिला सिनेमा असला तरी, त्याचे सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत. त्याला ते नेहमी प्रोसाहित करत असतात. रोहितिच्या ‘मिसमॅच्ड’ या मालिकेला प्रेक्षकांनी जसा प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद या चित्रपटालासुद्धा मिळेल यात शंकाच नाही.