Deepika Padukone Calls Out Oscars For Snubbing Indian Films
गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘ऑस्कर’ सोहळा पार पडला. हा सोहळा खरंतर प्रत्येक कलाकारासाठी खास असतो. या पुरस्कारासाठी जगभरातील प्रत्येक कलाकार जीवाचं रान करताना दिसतो. एखाद्या चित्रपटाला ‘ऑस्कर’पुरस्कार मिळणे ही बाब कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट मानली जाते. यंदाचा ‘ऑस्कर’पुरस्कार प्रियंका चोप्राने निर्मिती केलेल्या ‘अनुजा’ शॉर्टफिल्म शिवाय इतर कोणताही प्रोजेक्ट नव्हता. किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ चित्रपट देखील ऑस्करच्या शर्यतीत होता, पण तो चित्रपट पहिल्याच फेरीतून बाहेर पडला. यामुळे अनेक भारतीयांचा हिरमोड झाला. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणही व्यक्त झाली आहे.
संतोष देशमुखांच्या मुलाला भेटून आमिर खान भावूक! कडकडून मारली मिठी; किरण म्हणाली, ‘हिंमत कायम..’
दरम्यान, दीपिका पादुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती ‘ऑस्करच्या शर्यतीतून एका चांगल्या भारतीय चित्रपटाला वगळण्याची ही पहिलीच वेळ नाही. बऱ्याच चांगल्या चित्रपटांना आणि भारतीयांच्या टॅलेंटला ऑस्करने दुर्लक्षित केलंय. अनेकदा ऑस्करमध्ये भारतीय चित्रपट आणि भारतीय प्रतिभेबरोबर अन्याय झाला आहे. मला आठवतंय, २०२३ मध्ये ऑस्कर सोहळ्यामध्ये मी हजेरी लावली होती. मी प्रेक्षकांमध्ये बसले होते. जेव्हा RRR चित्रपटाचं नाव ऑस्करसाठी घेण्यात आलं तेव्हा मी भावुक झाले होते. माझा RRR मध्ये प्रत्यक्ष असा काही सहभाग नव्हता पण मी भारतीय होते. त्यामुळे तो माझ्यासाठी एक खास क्षण होता. RRRने ऑस्कर जिंकणं ही खूप वैयक्तिक आणि आनंदाची भावना होती.’ असं म्हटलं आहे.
दीपिकाने पॅरिसमधील लुई व्हिटॉन शोसाठी तयारी करतानाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यात तिने ऑस्करबद्दल हे भाष्य केलं आहे. तसंच २०२३ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ गाण्याच्या विजयाबद्दलची खास आठवणही तिने शेअर केली आहे. दीपिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पायल कपाडियाचा ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’, किरण रावचा ‘लापता लेडीज’, राही अनिल बर्वेचा ‘तुंबाड’ आणि रितेश बत्राचा ‘द लंचबॉक्स’यांसारख्या चित्रपटांची झलक दाखवण्यात आलेली आहे. या चित्रपटांची सर्वत्र प्रचंड प्रशंसा झाली असली, तरी त्यापैकी एकाही चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळालं नाही.
कुणाल कामराच्या समर्थनार्थ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उतरल्या मैदानात, काय म्हणाले सेलिब्रिटी ?
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री आई झाल्यापासून ती कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग करत नाहीये. सध्या तिची मुलगी ‘दुआ’च्या संगोपनात व्यस्त आहे. दीपिका शेवटची ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता आई झाल्यानंतर दीपिका कोणत्या आगामी चित्रपटात आणि कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याची तिचे चाहते वाट पाहत आहेत.