कॉमेडी टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम गुरचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांना अभिनेत्याचा कोणताही मागमूस मिळालेला नाही. गुरुचरणला जिथं जिथं शेवटचं पाहण्यात आलं त्या परिसरातली सीसीटिव्ही फुटेच तपासण्यात आले तरीही त्याचा अद्याप काहीही पत्ता लागलेला नाही. आता नुकतचं दिल्ली पोलिसांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटला भेट दिली.
[read_also content=”प्रियंका चोप्राने मदर्स डे ला लेक मालतीचा क्यूट व्हिडिओ केला शेअर, पतीसोबतही काढला सेल्फी! https://www.navarashtra.com/movies/priyanka-chopra-shares-adorable-video-of-daughter-malti-marie-on-mothers-day-get-cozy-with-husband-nick-jonas-532424.html”]
गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर पोहोचून लोकांची चौकशी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोचे अनेक कलाकार अभिनेत्याच्या संपर्कात होते. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. त्यांनी गुरचरण सिंगच्या माजी सहकलाकारांची चौकशी केली आणि त्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शोशी संबंधित सोहिल रमाणी यांनी मीडियाला सांगितले की, दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी शोच्या सेटला भेट दिली होती. ते म्हणाले, ‘दिल्ली पोलिसांनी तपासात आमच्या सेटला भेट दिली होती. गुरुचरणकडे आमच्याकडून कोणतीही थकबाकी नसल्याचे आश्वासन देऊन तो परत गेला. आम्ही त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत आणि आशा करतो की तो लवकर सापडेल.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोढीची भूमिका साकारणारे गुरुचरण सिंह 22 एप्रिल 2024 रोजी बेपत्ता झाले होते. मुंबईला जाण्यासाठी ते दिल्लीतील त्यांचे निवासस्थान सोडले होते, मात्र ते ना विमानतळावर पोहोचले ना घरी परतले. 27 एप्रिल रोजी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून कळले होते की अभिनेता 22 एप्रिल रोजी रात्री 9:14 वाजता दिल्लीच्या पालम भागात होता, त्यानंतर तो बेपत्ता झाला.