फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी भजन-कीर्तन गायचा, शाहिद कपूरच्या 'या' चित्रपटाने दिली दिलजीत दोसांझच्या करिअरला कलाटणी!
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या म्युझिक टूरमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. कायमच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या गायकाचा आज वाढदिवस आहे. दिलजीत दोसांझचा जन्म ६ जानेवारी १९८४ रोजी झाला असून यावर्षी दिलजीत त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. गायकाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ.
“देवा आला रं…” शाहिद कपूरच्या Deva चित्रपटाचा ॲक्शन- रावडी टीझर रिलीज
दिलजीत सुरुवातीपासूनंच पंजाबी इंडस्ट्रीत सक्रिय आहे. आता त्याने बॉलिवूडमध्येही स्वत:चा पाय चांगलाच रोवलाय. केवळ गायक म्हणून नाही तर बॉलिवूड सिनेमांमध्येही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक देखील दाखवली आहे. दिलजीतच्या वडिलांचं नाव बलबीर सिंह आणि आईचं नाव सुखविंदर कौर आहे. दिलजीतचे वडिल पंजाब रोडवेजचे निवृत्त कर्मचारी आहेत. दिलजीतला एक छोटा भाऊ आणि बहीण आहे. दिलजीतने त्याच्या शिक्षणासोबतंच त्याचं गाण्याचं करिअरही सुरु ठेवलं. करियरच्या सुरुवातीच्या दिवसांत दिलजीत किर्तनामध्ये गायचा. त्याने त्याच्या गाण्याच्या करिअरची सुरुवात २००४ मध्ये त्याचा पंजाबी अल्बम ‘इश्क दा उडा एडा’ने केली.
अभिनेता किरण मानेने शेअर केली Mufasa The Lion King साठी खास पोस्ट, केलं किंग खानचं विशेष कौतुक
त्यानंतर २००९मध्ये त्याने रॅपर हनी सिंहसोबत ‘गोलिया’ गाणं गायलं, ज्यामुळे तो आंतराष्ट्रीय स्टार बनला. २०११ मध्ये ‘द लायन ऑफ पंजाब’ चित्रपटातून दिलजीतने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले. त्याच्या ‘जट्ट अँड ज्युलिएट’ आणि ‘जट अँड ज्युलिएट २’ या चित्रपटांनी पंजाबी इंडस्ट्रीतील सर्वच चित्रपटांचे रेकॉर्ड तोडत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानी कायम राहिले. २०१४ मध्ये आलेल्या अनुराग सिंगच्या ‘पंजाब 1984’ या पंजाबी चित्रपटामधील दिलजीतच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. या चित्रपटानंतर दिलजीतसाठी हिंदी चित्रपटांचे मार्गही खुले झाले.
२०१६ मध्ये दिग्दर्शक अभिषेक चौबे यांचा प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘उडता पंजाब’मध्ये दिलजीतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातूनच त्यांनी अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हापासून दिलजीतची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. ‘उडता पंजाब’नंतर दिलजीत अनुष्का शर्मासोबत ‘फिल्लौरी’ चित्रपटात दिसला होता. २०१८ मध्ये, त्याने माजी भारतीय हॉकीपटू संदीप सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘सूरमा’ चित्रपटात संदीप सिंगची भूमिका साकारली होती.
त्यानंतर २०१९ मध्ये आलेल्या ‘गुड न्यूज’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातही दिलजीत दिसला होता. त्याचवेळी त्याचा ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. २०२१ या वर्षात त्याच्या ‘हौसला रख’ या चित्रपटानेही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवला.