संग्रहित फोटो
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर गावठाण परिसरात ६ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कांबळे हा तरुणीच्या घरी आला. तरुणीने ऑनलाइन खरेदी केली होती. वस्तू देत असताना त्याने तरुणीकडे पाणी मागितले. तरुणीने त्याला पाणी दिले. तेव्हा ‘तुम्ही खूप सुंदर दिसता’, असे कांबळे म्हणाला. कांबळेच्या वर्तनामुळे तरुणी घाबरली. तिने आरडाओरडा केला. कांबळे तेथून पसार झाला.
तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन कांबळेचा मोबाइल नंबर मिळवला, तसेच परिसरातील सीसीटीव्हीवरून ताब्यात घेतले आहे. कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून, सहायक निरीक्षक संतोष पाटील अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : मार्केट यार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार; धक्कादायक कारणही समोर
चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग
जालना येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर जिल्ह्यातील नजिक पांगरी येथे घडली. पीडितेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे चुलत सासरे हे पीडितेच्या मागे गेले. ती शेतात गेली असता, सावध होऊन तिच्या मागून तिला आपल्या मिठीत घेतले. त्यानंतर ‘तु मला आवडतेस’, असे म्हणत तिला खाली पाडले आणि तिच्याशी लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेनं फिर्यादीत म्हंटले आहे.






