(फोटो सौजन्य: X)
काय दिसलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये गर्लफ्रेंड मोबाईल टाॅवरच्या मधोमध जाऊन बसल्याचे दिसते. ती काही केल्या खाली उतरत नसते ज्याच्या परिणामात शेवटी पोलिस तरुणीच्या बाॅयफ्रेंडला घटनास्थळी घेऊन येतात ज्यानंतर मुलगी सुखरुप खाली उतरते. व्हिडिओमध्ये प्रियकराच्या चेहऱ्यावर कपडा लावण्यात आल्याचे दिसते ज्यामुळे त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसू नये. घटनेत पुढे काय घडलं याची माहिती देण्यात आली नसली तरी याचा व्हिडिओ मात्र सोशल मिडियावर आता चांगलाच ट्रेंड करत आहे. तरुणीच्या या कृत्याने इंटरनेटवर खळबळ माजवली असून हे नक्की यालाच खरं प्रेम म्हणतात का? असा प्रश्न आता नेटकरी करत आहेत.
Woman Climbs On Tower Demanding
Release Of Arr*sted Boyfriend | Watch pic.twitter.com/bq29nuY17k — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 8, 2026
हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘अटक केलेल्या प्रियकराची सुटका व्हावी अशी मागणी करत महिलेची टॉवरवर चढाई’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आशा आहे की असे प्रेम मला कधीतरी मिळेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दोघांनाही अटक करा म्हणजे ते एकत्र राहू शकतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे काहीसे बॉलीवूड लेव्हलच्या ड्रामासारखे आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






