Dont Send Aryan Into Jail I Will Help You Get What You Want Nrab
”आर्यन को जेल मत भेजो…तुला जे हवे ते मिळवण्यात मी मदत करेन’ ; समीर वानखेडेने शेअर केले शाहरुखसोबतचे Whatsapp स्क्रीनशॉट्स, वाचा chat
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता आपल्या बचावात समीर वानखेडे यांनी याचिकेत शाहरुख खानसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट जोडले आहेत.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता आपल्या बचावात समीर वानखेडे यांनी याचिकेत शाहरुख खानसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट जोडले आहेत. त्यानुसार शाहरुख खानने समीर वानखेडेला आर्यनला तुरुंगात न पाठवण्याची विनंती केली. त्याऐवजी, तो त्यांना सर्व प्रकारे मदत करण्यास तयार होता.
मुलगा जरा मनमौजी आहे पण…
स्क्रिनशॉट्सनुसार, शाहरुख खानने लिहिले होते, भगवान के लिए अपने बंदों से कहो कि जल्दबाजी न करें.. मी शपथ घेतो की मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि तुला जे काही साध्य करायचे आहे किंवा साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे त्यात मी तुला मदत करीन. हे वचन आहे आणि ते करण्यास सक्षम असण्याइतपत तु मला चांगले ओळखता. मी तुला विनंती करतो की कृपया माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दया कर. आम्ही साधी माणसं आहोत आणि माझा मुलगा थोडासा मनमौजी स्वभावाचा आहे. पण कठोर गुन्हेगाराप्रमाणे तुरुंगात डांबण्याइतका वाईट नाही. हे तुलाही माहीत आहे. मी तुला विनवणी करतो, दया कर.
कृपया त्याला तुरुंगात जाऊ देऊ नका
मी तुला विनंती करतो, कृपया त्याला तुरुंगात जाऊ देऊ नको. त्याचा माणुसकीवरचा विश्वास गमावू देऊ नको. काही लोकांमुळे त्याचा आत्मा मरेल. तू मला वचन दिले होते की तू माझ्या मुलाला सुधरण्यासाठी प्रयत्न करशील पण त्याला यासाठी अशा ठिकाणी नाही पाठवणार जेथून तो आला कि कोलमडेल. तसे केलेस तर मी यासाठी तुझा कायमचा ऋणी राहीन.
“मुलाचं आयुष्य बरबाद होऊ देऊ नका. तुम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं करा. मी कुणाकडेही मदत मागितलेली नाही. माझी ताकद कुठेही वापरलेली नाही. माझं कुठलंही स्टेटमेंट दिलेलं नाही. त्यामुळे तुमच्यातील माणुसकीच्या नात्याने जे काही करता येईल ते करा आणि त्याला लवकरात लवकर घरी कसं येता येईल, त्यासाठी प्रयत्न करा”, अशी विनंती शाहरुख खानकडून समीर वानखेडे यांच्याकडे केली जात होती.
असे झाले संभाषण
शाहरुख खान : कृपया मला कॉल कर. आर्यन खानचा वडील म्हणून मी तुझ्याशी बोलेन, तू चांगला माणूस आहे आणि एक चांगला पतीदेखील आहेस आणि मी सुद्धा. कायद्यामध्ये राहून माझ्या कुटुंबासाठी मी तुझ्याकडे मदत मागत आहे. मी तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या मुलाला जेलमध्ये जाऊ देऊ नको.
शाहरुख खान : जेलमध्ये गेल्यानं माणूस खचून जातो. तू मला प्रोमिस केलं आहे, माझ्या मुलाला बदलून टाकशील. माझ्या आणि माझ्या परिवारावर दया कर. माझ्या मुलाला घरी पाठव, मी तुझ्याकडे एक वडील म्हणून भीक मागतो.
समीर वानखेडे : शाहरुख खान मी तुला चांगला माणूस म्हणून ओळखतो. जे होईल ते चांगलं होईल. तू तूझी काळजी घे.
Web Title: Dont send aryan into jail i will help you get what you want nrab