Fandry fame shalu aka Rajeshwari Kharat gave reply to trollers after she converted to christian
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून महाराष्ट्रातल्या घराघरांत शालूला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. चित्रपटापासून ‘जब्याची शालू’ म्हणून प्रसिद्धीझोतात आलेल्या शालूला आजही चाहते याच नावाने हाक मारतात. ‘फँड्री’ चित्रपटाला रिलीज होऊन आज १२ वर्षे झाली आहेत. हा चित्रपट २०१३ साली रिलीज झाला होता. केव्हा ग्लॅमरस लूकमुळे तर केव्हा अपकमिंग प्रोजेक्टमुळे चर्चेत राहणारी राजेश्वरी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिच्या लाईफबद्दल एक महत्वाची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो पाहून चाहते नाराज झाले आहेत.
काही तासांपूर्वीच राजेश्वरी खरातने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने धर्मांतरण केल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये राजेश्वरीने ख्रिश्चन धर्म स्विकारल्याचे पाहायला मिळत आहे. धर्म स्विकारतानाचे काही फोटोज् राजेश्वरी खरातने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये राजेश्वरी पाण्यात हात जोडून, डोळे बंद करून उभी आहे. एका व्यक्तीचा हात तिच्या डोक्यावर दिसतोय, तर एका व्यक्तीचा हात तिच्या खांद्यावर दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना Baptised हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ ख्रिश्चन धर्मात प्रवेश असा होतो. त्याचबरोबर रेड हार्ट इमोजी देखील वापरला आहे.
‘केसरी २’ च्या यशादरम्यान अक्षय कुमारने विकले ऑफिस, जाणून घ्या अभिनेत्याची एकूण संपत्ती!
दुसऱ्या एका पोस्टमध्ये राजेश्वरीने कुटुंबातील काही सदस्यांबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने न्यू बिगिनिंग्स, इस्टर असे हॅशटॅग दिले आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो पाहून नेटकरी नाराज झाले आहेत. ते म्हणतात, “ही अपेक्षा नव्हती”, “श्रीमद भगवदगीता वाचलीस असती तर तू हा निर्णय घेतला नसता.”, “पैशांसाठी काय पण…”, “राज्यात आणि देशात बहुतेक ठिकाणी पैसे, ईश्वराच्या चमत्काराची भूल देऊन धर्म परिवर्तन केले जात आहे.. आता सरकारने ख्रिश्चनमध्ये धर्म परिवर्तन केलेले या लोकांचा कास्ट सर्टिफिकेट कॅन्सल करणे गरजेचं आहे आणि या Chrisitian Missionarry वर पण लक्ष देण गरजेच आहे..” अशा कमेंट्स राजेश्वरीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.