अल्पवधीत लोकांच्या पंसतीस उतरलेली झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशिमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) मालिका लवकरच बंद होणार आहे. मालिकेच्या कलाकारांनी शेवटच्या टप्प्यातले शुटींग केल्याची पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. मात्र, त्यांच्या पोस्टनतरं प्रेक्षकांना धक्का बसला असून अनेक जणांनी मालिका बंद होण्याबाबत प्रश्न विचारले आहेत.
‘माझी तुझी रेशिमगाठ’ ही मालिका सुरु झाल्यापासून त्यातील कलाकार मंडळी कायम चर्चेत असतात. नेहा आणि यश साकारणारे श्रेयस तळपदे आणि [blurb content=””] तसेच सगळ्यांची लाडकी परी म्हणजे मायरा वायकुळ हे सगळे प्रेक्षकांचे आवडते कलाकार झाले आहेत. नेहा आणि यशची केमेस्ट्री परीचा गोड स्वभाव प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला होता. मात्र, अचानक मालिका बंद घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालिकेचे चाहते नाराज झाले असूनसोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
प्रार्थनानं ‘अभी ना जाओ छोडकर’ या गाण्याचा व्हिडीओ शेअर मालिकाच्या आठवणी शेयर केल्या. तर संकर्षण कर्हाडेने ही त्याच्या आणि श्रेयस तळपदेचा सेटवरील फोटो शेयर केला. तर मायरानं शेअर केलेल्या पोस्टला एका युझरनं कमेंट केली, ‘ही मालिका का बंद करत आहेत? आम्ही परीला खूप मिस करु’.