मुंबई : कोल्हापूरच्या मर्दानी खेळावर तयार करण्यात आलेल्या ‘वारसा’ या माहितीपटाला 2022 च्या फिल्मफेअर पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे. Best Film – Non Fiction या श्रेणीमध्ये हा पुरस्कार प्राप्त झाला असून 21 डिसेंबर रोजी मुंबईतील ताज लँड एन्ड या सेवन स्टार हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहोळा पारपडला.
सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्य दिव्य स्वरूपात दिसणाऱ्या माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल 30 लाख खर्च झाला आहे. या फिल्मसाठी सलग दोन वर्षे रिसर्च आणि सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. कोल्हापूरच्या कला व क्रीडाविश्वासाठी ही मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. फुटबॉलवेड्या कोल्हापुरात मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू आणि त्यांना घडविणारी वस्ताद मंडळी स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ शिवरायांवरील प्रेमापोटी जपत आहेत. मर्दानी खेळ म्हणजे शिवकालीन युद्धकला असून त्याला भारतभरात पोहोचवण्यासाठी सूर्यवंशी यांनी हा माहितीपट बनवला.
माहितीपट बनवताना सचिन यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरी माघार न घेता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा माहितीपट पूर्ण केला. 2019 मध्ये सचिन सूर्यवंशी यांच्याच सॉकर सिटी या माहितीपटाला फिल्मफेअर मिळाला होता. आपल्या कोल्हापूरच्या सुपुत्राने तीन वर्षात दोनवेळा फिल्मफेअर मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावल्यामुळे त्याच्यावर सर्वस्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.






