(फोटो सौजन्य - अकाउंट)
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता व्हॅल किल्मर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. किल्मर यांचे न्यूमोनियामुळे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. व्हॅल यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांची मुलगी मर्सिडीज किल्मर यांनी केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मर्सिडीजने असोसिएटेड प्रेसला दिलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, किल्मर यांचे मंगळवार, १ एप्रिल रोजी रात्री लॉस एंजेलिसमध्ये निधन झाले आहे. अभिनेत्याच्या या दुःखद बातमीने चाहते निराश झाले आहे.
१९८४ मध्ये कारकिर्दीला सुरुवात केली
व्हॅल किल्मर यांचे न्यूमोनियामुळे निधन झाले आहे. २०१४ मध्ये, अभिनेत्याला घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. मात्र, उपचारानंतर तो बरा झाला. अभिनेता व्हॅल किल्मरने १९८४ मध्ये ‘टॉप सीक्रेट’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर अभिनेत्याने ‘टॉप गन’, ‘रियल जीनियस’, ‘विलो’, ‘हीट’ आणि ‘द सेंट’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवली. आणि कामातून चाहत्यांच्या मनावर राज्य केले.
अभिनेत्याने स्वतःबद्दल सांगितले
व्हॅल किल्मर हा एक बहुप्रतिभावान अभिनेता होता. त्याने ‘टॉप गन’ मध्ये आइसमनची भूमिका केली होती. ‘बॅटमॅन फॉरएव्हर’ मध्ये बॅटमॅन म्हणून हा अभिनेता दिसला होता. यानंतर अभिनेत्याने ‘द डोअर्स’ मध्ये जिम मॉरिसनची भूमिका केली. व्हॅल किल्मरने त्याच्या कारकिर्दीबद्दल २०२१ च्या माहितीपट “व्हॅल” च्या शेवटी म्हटले. “मी वाईट वागलो आहे, माझे काही लोकांशी विचित्र वर्तन झाले आहे. मी त्यापैकी काहीही नाकारत नाही आणि मला त्याचा पश्चात्तापही नाही, कारण मी स्वतःचे असे भाग गमावले आहेत आणि शोधले आहेत जे मला कधीच माहित नव्हते की माझ्याकडे आहेत.”
‘ऐश्वर्या-अभिषेक एक नंबर…’ चुलत भावाच्या लग्नात कपलचा ‘कजरा रे’ गाण्यावर अफलातून डान्स, पाहा व्हिडीओ
अभिनेत्याचा हा होता शेवटचा चित्रपट
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘टॉप गन: मॅव्हरिक’ हा व्हॅल किल्मरच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. यामध्ये त्याने आइसमनची भूमिका साकारली होती. व्हॅल कोणतीही भूमिका अतिशय तीव्रतेने साकारण्यासाठी प्रसिद्ध होते. ते यासाठी काहीही करत असे. ‘द डोअर्स’ मध्ये मॉरिसनची भूमिका साकारण्यासाठी तो नेहमीच लेदर पँट घालायचा. त्यांनी उर्वरित कलाकारांना आणि क्रूला फक्त जिम मॉरिसन असे बोलावण्यास सांगितले होते.