अबब! Samsung ने आणला अँड्रॉईड 16 बेस्ड One UI 8.5 अपडेट, कोणत्या स्मार्टफोन मॉडेल्सना मिळणार नवीन अपग्रेड्स? जाणून घ्या
सादर करण्यात आलेल्या नवीन अपडेटमध्ये अनेक खास अपग्रेड्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये नाऊ नज, अधिक चांगले सर्कल टू सर्च, अपग्रेडेड बिक्सबी, जेमिनी आणि परप्लेक्सिटीसाठी सपोर्ट दिले आहे. इतकंच नाही तर नव्या अपग्रेडमध्ये AI-पावर्ड क्रिएटिविटी टूल्स आणि सिक्योरिटीमध्ये एन्हांसमेंट समाविष्ट आहे. सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा, गॅलेक्सी S26 प्लस आणि गॅलेक्सी S26 हे वन UI 8.5 प्रीलोडेडसह येतात. तर, आता प्रश्न असा आहे की गॅलेक्सी S25 सिरीज, गॅलेक्सी S24 मालिका, गॅलेक्सी Z फोल्ड आणि गॅलेक्सी Z फ्लिप 7 ला अँड्रॉईड 16-आधारित अपडेट कधी मिळेल. याबाबत यूजर्सच्या मनात अनेक प्रश्न आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंगने त्यांच्या जुन्या जेनरेशनच्या फ्लॅगशिपसाठी One UI 8.5 अपडेट ऑफिशियली कधी रिलीज केले जाणार, याची तारीख अद्याप जाहिर केली नाही. मात्र लीक्सवर विश्वास ठेवला तर, गॅलेक्सी S25 सिरीजसाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीला One UI 8.5 अपडेट रिलीज केले जाणार आहे. हे अपडेट सध्या चाचणी टप्प्यात आहे. लवकरच यूजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.
लीक्सवरून अशी माहिती मिळत आहे की, गॅलेक्सी S24 सीरीजसाठी अपडेट मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला रिलीज केले जाऊ शकते. मात्र अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही. गॅलेक्सी Z फोल्ड 7 आणि गॅलेक्सी Z फ्लिप 7 बद्दल बोलायचं झालं तर, रिपोर्ट्स ‘प्रायोरिटी रोलआउट’ सूचित करत आहेत. याचा अर्थ असा आहे की, डिव्हाईसला मार्च महिन्यात अपडेट मिळू शकते. गॅलेक्सी S23 सीरीज आणि गॅलेक्सी S22 सीरीजसाठी हळूहळू One UI 8.5 अपडेट रिलीज केले जाणार आहे. अपडेट कधी रिलीज केले जाणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही. एप्रिल ते जून दरम्यान अपडेट मिळू शकते. त्यानंतर, गॅलेक्सी ए, एम आणि एफ सिरीजना हळूहळू अपडेट मिळण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला रिलीज करण्यात आलेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर One UI 8.5 कोणत्या डिव्हाईससाठी रिलीज केले जाणार याची यादी समोर आली आहे.
गॅलेक्सी S25 सीरीज: S25, S25+, S25 Ultra, S25 FE, S25 Edge.
गॅलेक्सी S24 सीरीज: S24, S24+, S24 Ultra, S24 FE.
गॅलेक्सी S23 सीरीज: S23, S23+, S23 Ultra, S23 FE.
गॅलेक्सी S22 सीरीज: S22, S22+, S22 Ultra.
फोल्डेबल: गॅलेक्सी Z Fold/Flip 7, 6, 5 आणि 4 मॉडेलला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
गॅलेक्सी A, M, F सिरीज: 2023-2026 मॉडेल्सच्या मोठ्या संग्रहात, ज्यामध्ये A56/A36, M56/M36 आणि F56/F36 यांचा समावेश आहे, अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे.
टॅब्लेट: गॅलेक्सी टॅब S11/S10/S9/S8 सीरीज.
सॅमसंगने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. ही माहिती लीक्सवर आधारित आहे.






