KBC जिंकल्यावर किती रक्कम मिळते (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अमिताभ बच्चन निवेदक म्हणून असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा रियालिटी गेम शो गेले २५ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या शो द्वारे अनेक करोडपती झाले. सध्या “कौन बनेगा करोडपती” (KBC) च्या १७ व्या सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. उत्तराखंडचा रहिवासी आणि CISF मध्ये कमांडंट म्हणून काम करणाऱ्या आदित्य कुमारने आपले ज्ञान आणि समज दाखवून १ कोटी रुपयांची रक्कम जिंकली आहे. अशा प्रकारे, ११ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सीझनमध्ये हा पराक्रम करणारा तो पहिला स्पर्धक ठरला आहे.
खरं तर अमिताभ बच्चन १ कोटी मिळाल्याची घोषणा अशा पद्धतीने करतात की आपल्यालाच जिंकल्याचा आनंद होतो. पण ही १ कोटी रक्कम पूर्ण विजेत्याच्या खात्यात जमा होते का? अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की KBC मध्ये १ कोटी रुपयांचा विजेता संपूर्ण रक्कम मिळवतो की नाही. तर याचे उत्तर नाही आहे. कारण जिंकलेली रक्कम आयकर नियमांनुसार कर आकारून मगच विजेत्याच्या खात्यात जमा केली जाते. कर कपातीनंतर शिल्लक असलेली रक्कम विजेत्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
अमिताभ बच्चनने केले पंकज त्रिपाठीचे कौतुक, म्हणाले- ‘त्यांचे चित्रपट पाहतो आणि शिकतो’!
अशा प्रकारे, १ कोटी रुपये जिंकणाऱ्या आदित्य कुमारला कर कपातीनंतर त्याच्या खात्यात सुमारे ६५.६८ लाख रुपये मिळतील. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की विजेत्यांना त्यांचे आयकर रिटर्न (ITR) भरताना “इतर स्रोतांमधून उत्पन्न” अंतर्गत हे उत्पन्न दाखवावे लागते. त्यामुळे १ कोटी हे ऐकायला जरी मस्त वाटत असतील तरीही विजेत्याला त्यातून साधारणतः ४० लाखाचा कर भरावा लागतो आणि त्यानंतरच ती रक्कम त्याच्या खात्यात जमा होते. कधीही विजेत्याला संपूर्ण १ कोटीची रक्कम मिळत नाही.
केबीसी हा फक्त एक गेम शो नाही; तो एक सुरळीत चालणारी पैशाची मशीन आहे असे म्हटले जाते. आता है पैसे नक्की कुठून येतात तर प्रायोजकत्व आणि जाहिरातीमधून पैसे जमा होतात. केबीसीला मोठ्या संख्येने प्रेक्षक मिळतात, ज्यामुळे ते जाहिरातदार आणि प्रायोजकांसाठी हा शो उत्तम ठरतो. शो दरम्यान त्यांच्या जाहिराती दाखवण्यासाठी किंवा प्रायोजक बनण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि यातून पैसे विजेत्यांना देण्यात येतात.
‘कौन बनेगा करोडपती’शो ला २५ वर्षे पूर्ण, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली खास पोस्ट…
१. केबीसीमध्ये ७ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकणारा पहिला विजेता कोण होता?
२०१४ मध्ये केबीसी ८ दरम्यान अचिन नरुला आणि त्याचा धाकटा भाऊ सार्थक नरुला या जोडीने ही कामगिरी केली. ७ कोटी रुपयांची रक्कम जिंकणारा तो या शोचा पहिला स्पर्धक ठरला.
२. आदित्य कुमारने केबीसीमध्ये किती पैसे जिंकले?
उत्तराखंडचा आदित्य कुमार अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या ‘कौन बनेगा करोडपती १७’ चा पहिला करोडपती ठरला. लाईफलाईन वापरून प्रश्नांची उत्तरे देऊन त्याने १ कोटी रुपये आणि एक कार जिंकली. आनंदाने भारावून आदित्यने बिग बींचे पाय स्पर्श केले आणि एका जुन्या विनोदाचा एक मजेदार किस्सा सांगितला.
३. केबीसीसाठी अमिताभ बच्चन यांना किती पैसे मिळतात?
रिपोर्टनुसार, ते आता भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे टीव्ही होस्ट आहेत, ज्यांची प्रति एपिसोड ₹५ कोटी आहे, म्हणजेच आठवड्याला एकूण ₹२५ कोटी होतात.