Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत भक्तीचा परमोच्च आविष्कार घडणार, स्वामी ‘मल्हारी मार्तंड’रूपात दर्शन देणार!

अनेकांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या आणि मनाला उभारी देणाऱ्या प्रवासाचा या आठवड्यात महत्वाचा टप्पा पूर्ण झाला. स्वामींच्या अलौकिक लीलांचे महापर्व मालिकेत सुरू असून स्वामी बखरीचा महाअध्याय मालिकेत उलगडत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 21, 2025 | 05:11 PM
‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत भक्तीचा परमोच्च आविष्कार घडणार, स्वामी ‘मल्हारी मार्तंड’रूपात दर्शन देणार!

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत भक्तीचा परमोच्च आविष्कार घडणार, स्वामी ‘मल्हारी मार्तंड’रूपात दर्शन देणार!

Follow Us
Close
Follow Us:

स्वामी जगाची माऊली,स्वामी कृपेची सावली,ऐसी निरंतर माया,आम्ही कुठे ना पाहिली.गेली पाच वर्ष दररोज रात्री आठ वाजता कलर्स मराठीवरुन स्वामी कृपेचा हा गजर घराघरात सुरू असतो.अनेकांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या, मनाला उभारी देणाऱ्या , जगण्याची वाट सुकर करणाऱ्या या प्रवासाचा या आठवड्यात १४०० भागांचा टप्पा पूर्ण झाला.

स्वामींच्या अलौकिक लीलांचे महापर्व मालिकेत सध्या सुरू असून गोपाळ बुवा केळकर लिखित स्वामी बखरीचा महाअध्याय मालिकेत अत्यंत नाट्यमय प्रसंगांनी उलगडत आहे.यातून मिळणारी जगणे समृद्ध करणारी शिकवण आणि स्वामीप्रेरणा अनेकांचे आयुष्य घडवणारी ठरली आहे. हाच स्वामी विचारांचा निरंतर प्रवास पुढे अखंड सुरू राहणार असून प्रेक्षकांच्या मनातले मालिकेचे हे अढळ स्थान असेच कायम राहील.

हाच निर्धार पुढे नेणारा जय जय स्वामी समर्थ मालिकेचा २३ फेब्रुवारीला होणारा महारविवार विशेष भाग चुकवू नये असा आहे. ज्यात स्वामी समर्थ भक्तांना मल्हारी मार्तंड रूपात दर्शन देणार आहेत .तेंव्हा नक्की पहा जय जय स्वामी समर्थ मालिकेचा महारविवार विशेष भाग २३ फेब्रुवारी दु. १ आणि रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

“उभे रहा, नजर काढायचीये तुमची…” घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; Video Viral

तान्ही असताना खंडोबा मंदिरात पायरीपाशी सोडलेल्या अनाथ गौरीच्या,तारकमंत्राने झालेल्या उद्धाराची ही अत्यंत भावनिक गोष्ट आहे,त्याला मायेचा पदर आहे.स्वामी कृपेची सावली आहे.स्वामींनी छोट्या गौरीला बळवंतरावांचा मुलगा मार्तंड समोर कीर्तनस्पर्धेला उभे केले आहे.या स्पर्धेत तिला खंडोबा देवाचे पारंपरिक पद गायला सांगितले जाते आणि गौरी भावनिक होते.ज्या देवाच्या पायरीशी तिचा सांभाळ करणाऱ्या आबांनी जीव सोडला,त्या देवाची स्तुती कशी गाऊ असा प्रश्न तिला पडतो.

ती स्वामींपाशी जाते आणि ते तिला आमच्या पायाशी तुझं एक नातं दुरावलंय ना,मग आमच्याच पायाशी तुला तुझं हक्काचं नातं मिळेल…असे म्हणत स्वामी मल्हारी मार्तंड रूपात प्रकट होतात. हे तुझंच रक्त आहे फक्त जे तू नाकारलं होतंस असे स्वामी यावेळी कोणाला उद्देशून म्हणतात ? स्वामींची ही नेमकी लीला काय याचे अत्यंत भारावून टाकणारे, एक जगावेगळा जीवनसंदेश समोर आणणारे उत्तर, हे आवर्जून अनुभवण्यासारखे आहे. माया,ममता, वात्सल्य यांचा संगम असलेली ही अनोखी स्वामी लीला चुकवू नये अशी आहे.

अखेर ठरलं! सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय, प्रमुख भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता…

या कथाभागात लोकप्रिय बालकलाकार शुभ्रा तिळगूळकर आणि यश वाकळे, गौरी आणि मार्तंडची भूमिका करत असून राजा राणीची जोडी फेम अभिनेता शिवशैलेश कोरडे आणि श्रुती कुलकर्णी हे खऱ्या आयुष्यातले दांपत्य त्यांच्या आईवडिलांची भूमिका करत आहेत. यासर्वच कलावंतांच्या अविस्मरणीय अभिनयाने हा कथाभाग लक्षणीय ठरला आहे.

Web Title: Jai jai swami samarth maha ravivar episode swami will give darshan in malhari martand avtar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • colors marathi
  • colrs marathi serials
  • Entertainment News
  • serial update
  • Television Shows

संबंधित बातम्या

Nandurbar Crime: आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला
1

Nandurbar Crime: आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला

Tejaswini Lonari चा हिरव्याकंच साडीमधील लुक, लग्नानंतर नववधूचा Glow दिसतोय कमालीचा आकर्षक
2

Tejaswini Lonari चा हिरव्याकंच साडीमधील लुक, लग्नानंतर नववधूचा Glow दिसतोय कमालीचा आकर्षक

‘पारू’फेम अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, सून अमृताने सोशल मीडियावर केले शेअर
3

‘पारू’फेम अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, सून अमृताने सोशल मीडियावर केले शेअर

colors marathi Serial : दिव्य आवर्तन योगाने नशिबाचं चक्र फिरणार … जगदंबा, महिपती -शिवाच्या आयुष्याला नवं वळण मिळणार!
4

colors marathi Serial : दिव्य आवर्तन योगाने नशिबाचं चक्र फिरणार … जगदंबा, महिपती -शिवाच्या आयुष्याला नवं वळण मिळणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.