नवीन आणि वादग्रस्त कल्पनेसह आलेला ‘जनहित में जारी’ (Janhit Me Jaari) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.
नुसरत भरुचा स्टारर चित्रपट ‘जनहित में जारी’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये बरीच सुधारणा झाली असून चित्रपटाची हीच गती कायम राहिल्यास लवकरच हा चित्रपट इतर चित्रपटांना टक्कर देऊ शकतो. प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाची तिकिटे खूपच कमी ठेवली आहेत. चित्रपटाची तिकिटे 100 रुपयांनाही उपलब्ध आहेत. असे केल्याने चित्रपटाची तिकिटे अधिकाधिक विकली जातील असा निर्मात्यांना विश्वास होता.
या सगळ्या युक्त्यांनंतर जिथे चित्रपटाने शुक्रवारी केवळ 43 लाखांची कमाई केली होती, मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी चित्रपटाने 70 लाखांची कमाई केली आहे. रविवारीही या चित्रपटाची कमाई वाढण्याची खूप आशा आहे आणि जर असे झाले तर नुसरतचा चित्रपट आश्चर्यकारक कामगिरी करेल.
नुसरत भरूचाच्या ‘जनहित में जारी’ चित्रपटाची कथा कंडोम विकणाऱ्या मुलीची आहे. समाजाच्या रूढिवादी विचारसरणीला आव्हान देणाऱ्या या चित्रपटात भरपूर मनोरंजनही करण्यात आले आहे.