पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (Punjabi Singer Sidhu Moosewala)यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पंजाबसह अख्खा देशातून प्रतिक्रीया उमटत आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला यांना ओळखले जायचे.
“सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात येणे हे खूप धक्कादायक आणि दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो”. असं कॉमेडियन कपिल शर्माने ट्वीट करत लिहितं शोक व्यक्त केला. तर, हिमांशी खुराणाने देखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.