करीना-सैफच्या रिलेशनशिपबद्दल समजल्यावर करिश्मा कपूरची प्रतिक्रिया कशी होती ?
९० च्या दशकातल्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये करीना कपूर आणि करिश्मा कपूरचा कायमच समावेश केला जातो. कपूर कुटुंबीयांमधील या दोघीही पहिल्याच अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीमध्ये आल्या आहेत. गेल्या तीन दशकांपासून करीना आणि करिष्मा इंडस्ट्रीत सक्रिय आहे. नुकत्याच ह्या दोघीही बहिणींनी नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये, जेव्हा करीना-सैफच्या रिलेशनशिपबद्दल समजलं, तेव्हा तुझी (करिश्मा) पहिली प्रतिक्रिया कशी होती ? असा प्रश्न कपिलने करिश्माला विचारला होता.
तिने दिलेलं उत्तर ऐकून सर्वच आश्चर्यचकित झाले होते. करीना कपूरने सैफसोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदा कधी खुलासा केला याबद्दल बोलताना करिश्मा कपूरने सांगितले की, “आम्ही दोघी तेव्हा लंडनमध्ये होतो. करिनाने तिला काय सांगायचं आहे हे सांगण्यापूर्वी ती मला म्हणाली की, तू आधी एका ठिकाणी बसून घे. पण ती मला असं बसायला का सांगतेय ? हे मला काही कळत नव्हतं. आम्ही दोघीही तेव्हा लंडनमध्ये एका दुकानात शॉपिंग करत होतो. तर मी त्या दुकानातल्या एका सोफ्यावर बसून घेतले. त्यानंतर तिने मला जे काही सांगितले, ते ऐकून मी लोटपोट हसत होते.”
मुलाखतीत पुढे करिश्माने सांगितले की, “मला करीना म्हणाली की, “मी सेफवर प्रेम करते, असं मला तुला सांगायचं आहे. आम्ही दोघंही एकमेकांना डेट करतोय.” करीनाने मला सांगितलेली गोष्ट ऐकून त्या बेडला घट्टबसून राहावं की काय असं वाटत होतं.” मुलाखती दरम्यान करिश्माने सांगितलं की, मला करीनाने सांगितलेली गोष्ट समजायला काही वेळ लागला. “सैफ तर माझा मित्र आणि सहकलाकार होता नाही का?” असं करिश्माने करीनाला विचारले.
त्यानंतर कपिलने करीनाला विचारले की, पहिलं प्रेम कोणी व्यक्त केलं, सैफने की करीनाने ? तर करीना म्हणाली, “जे मला ओळखतात, त्यांना माहित असेल की, मीच त्याला प्रपोज केलं असेल. पण आमच्यामध्ये, त्याला थेट माझ्या भावना सांगाव्या, हे माझ्यासाठी फार महत्वाचे होते.” शोमध्ये करीनाने तिच्या स्वभावाविषयीही सांगितले. ती म्हणाली की, “सगळ्यांना माहितीये की, मी स्वतःची आवडती आहे. त्यामुळे कोणी सांगण्याआधी मला त्यालाच सांगणं गरजेचं होतं…”
करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज झालेल्या ‘मर्डर मुबारक’ चित्रपटामध्ये करिश्मा कपूर शेवटची दिसली होती. त्यानंतर सध्या करिश्मा ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिॲलिटी शोचं जजिंग करत आहे. तर करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘द बकिंगहॅम मर्डर्स’मध्ये ती शेवटची दिसली होती. तिचे या चित्रपटातल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. करीना कपूर लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात करिनाव्यतिरिक्त अजय देवगण, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर दिसणार आहेत.