कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांची मुख्य भूमिका असलेला नमाह पिक्चर्स, समीर विद्वांस दिग्दर्शित, साजिद नाडियादवालाचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) २९ जून २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. शूटिंगच्या सुरुवातीपासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे.
[read_also content=”किरीट सोमय्यांच्या रडारवर अस्लम शेख व आदित्य ठाकरे, मढ मार्वेतील स्टुडिओ उभारण्यात १ हजार कोटींचा घोटाळा https://www.navarashtra.com/maharashtra/madh-marve-studio-construction-unauthorized-kirit-somayya-319621.html”]
‘सत्यप्रेम की कथा’ ही आगामी संगीतमय प्रेमकथा आहे. या चित्रपटाद्वारे कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी दुसऱ्यांदा एकमेकांसोबत पडद्यावर दिसणार आहेत. कियारा आणि कार्तिक हे आज इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत, ज्यांना पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. ‘सत्यप्रेम की कथा’ २९ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.