Korean Singer Wheesung Found Dead At His Home In Seoul
म्युझिक इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. केपॉप गायक आणि गीतकार व्हिसंग याचे निधन झाले आहे. दक्षिण कोरियामधील नॉर्थ सियोलध्ये स्थित असलेला असलेला गायक आपल्या राहत्या घरातच मृतावस्थेत आढळला, तो ४३ वर्षांचा होता. गायकाच्या निधनाचे वृत्त दक्षिण कोरियाच्या पोलिसांनी दिले आहे. दक्षिण कोरियामधील असलेली तेथील मनोरंजनविश्वातील बातम्या देणाऱ्या ‘सूम्पी’ वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिसंगच्या कुटुंबाकडून माहिती मिळाल्यानंतर, पोलिस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी भारतीय वेळेनुसार दुपारी २:५९ वाजता गायकाच्या घरी पोहोचले होते.
गायिका चोई व्हिसंग यांच्या मृत्यूचे गुढ शोधण्यासाठी तेथील स्थानिक पोलिस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहे. अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त पोलिसांना कळताच त्यांनी आपल्या तपासाची चक्रे गतिशिल पद्धतीने फिरवली. दक्षिण कोरियाची फिल्म इंडस्ट्रीसंबंधित असलेली एजन्सी ‘ताईजो एंटरटेनमेंट’ने व्हिसंगच्या मृत्यूची पुष्टी करणारे निवेदन जारी केले. त्या निवदेनात नमुद करण्यात आले की, “ही माहिती देताना आम्हाला खूप दुःख होत आहे, सर्वांचे लाडके कलाकार व्हिसंग यांचे १० मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या राहत्या घरीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.”
‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चा धमाल टिझर रिलीज; चित्रपटात दिसणार मराठी इंडस्ट्रीतील तगडी स्टारकास्ट
निवेदनात पुढे नमुद करण्यात आले की, “व्हिसंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून गायकाचे कुटुंबीय आणि आप्तेष्ट, मित्र मंडळी, सहकलाकार आणि ताजोया एंटरटेनमेंटच्या सर्व सदस्यांना खूपच दुःख झाले आहे. व्हिसंगच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आम्ही तुम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो.” व्हिसंगने २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची ‘इनसोम्निया’, ‘कँट वी’ आणि ‘विथ मी’ ही गाणी लोकांना खूप आवडली.