यंदाचे ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आणि ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. येत्या २४ एप्रिलला मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा स्मृतीदिन आहे. मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा स्मृतीदिन यंदाचा ८३ वा असणार आहे. हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा मुंबईच्या विलेपार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडणार आहे. दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीदिनीच हा सोहळा पार पडणार आहे. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळापासून ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान’ ही सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट प्रत्येक वर्षी उद्योगपती, समाजकारण, राजकारण, अभिनय यासह वेगवेगळ्या इंडस्ट्रीतल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करतंय. दरवर्षी प्रमाणे, यावर्षीही या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टने पुरस्कार जाहीर केले आहेत.
अपूर्वा नेमळेकरची वडिलांसाठी भावूक पोस्ट; म्हणाली, “तुम्ही कुठून तरी ऐकू शकाल, पण…”
२०२५ या वर्षाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आदित्य बिर्ला ग्रुपचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष पद्मविभुषण कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आला आहे. दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या विकासातील अतुलनीय योगदानासाठी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी संगीत, नाटक, साहित्यासह सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचाही गौरव करण्यात येणार आहे. त्यांना ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ या पुरस्काराने गौरविले जाईल. श्रीपाल सबनीस यांना त्यांच्या वक्तृत्वपूर्ण आणि चिरस्थायी साहित्यिक योगदानासाठी वाग्विलासिनी पुरस्कार प्रदान केला जाईल. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रन’ ला त्यांच्या अथक कार्याबद्दल सन्मानित केलं जाणार आहे.
त्याचबरोबर स्क्रिप्टिस क्रिएशन आणि रंगाई प्रॉडक्शन यांच्या ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाला वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे. शिवाय, अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), श्रद्धा कपूर यांनाही ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीलाही ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ने सम्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीय संगीताच्या क्षेत्रातील प्रतिभावान रीवा राठोडलाही यावेळी ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ने गौरविण्यात येणार आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार शरद पोंक्षे यांच्यासह शास्त्रीय संगीताच्या जगातील दोन प्रतिष्ठित महिलांनाही ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ने गौरविण्यात येणार आहे. दिग्गज व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ. एन. राजम यांनाही ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आलेला आहे.
बॉबी देओलने खरेदी केली अलिशान Range Rover SUV, किंमत ऐकून चक्रावून जाल
२०२२ मध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापित केलेला हा प्रतिष्ठित पुरस्कार यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आशा भोसले आणि अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आहे. यंदा या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेनुसार “सारं काही अभिजात” या आत्म्याला भिडणाऱ्या संगीतमय श्रद्धांजलीनं पुरस्कार सोहोळ्याचा समारोप होईल. यावेळी विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार यांच्यासह अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर यांच्या अनोख्या व्याख्यानाचंही यावेळी आयोजन करण्यात आलं आहे.