अपूर्वा नेमळेकरची वडिलांसाठी भावूक पोस्ट; म्हणाली, "तुम्ही कुठून तरी ऐकू शकाल, पण..."
वडील आणि मुलीचं नातं शब्दात मांडणे कठीण आहे. खरंतर, बाप हा फक्त मुलीच्याच नाही तर, मुलाच्याही आयुष्यातला एक सुपरहिरो असतो. जो पर्यंत आपल्या आयुष्यामध्ये वडिलांची छत्रछाया असते, तो पर्यंत आपल्यासाठी कोणतीही गोष्ट खूप साधी असते. त्यांना एखादी गोष्ट साधी मार्केटमधून जरीही आणायला सांगितली की, बाबा अगदी तिला खाऊन कंटाळा येईल एवढ्या प्रमाणात तो पदार्थ घेऊन येतात. असं बाबाचं निराळं प्रेम अनेकांच्या आयुष्यात असतं, तर अनेकांच्या नसतं. बापाचं नसणं एखाद्या मुलाला आणि मुलीला फार जिकरीचं ठरतं. एकदा का आयुष्यातील बापमाणसाची छत्रछाया निघून गेली की, आपलं आयुष्य अर्धवट राहून जाते. वडिलांच्या जाण्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरही खचून गेली होती.
तिच्या वडिलांना जाऊन जवळपास ८ वर्षे झाली आहेत. या ८ वर्षांत अभिनेत्रीने आणि तिच्या फॅमिलीने अनेक कठीण परिस्थितींना तोंड देत संघर्ष केला आहे. आज अपूर्वा नेमळेकरच्या वडिलांचा वाढदिवस आहे. खास वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तिने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट शेअर केलेली आहे. यापूर्वीही अनेकदा अभिनेत्रीने आपल्या वडिलांबद्दल सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केलेली आहे. जुना फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने आपल्याला अश्रुंना वाट मोकळी केलीये.
बॉबी देओलने खरेदी केली अलिशान Range Rover SUV, किंमत ऐकून चक्रावून जाल
शेअर केलेल्या पोस्टमध्ये वडिलांचा फोटो पोस्ट करत अपूर्वा नेमळेकर म्हणते,
“बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
तुमच्याशिवाय जगून जवळजवळ ८ वर्षे झाली आहेत आणि तरीही हा दिवस अजूनही तुमचाच आणि कायमच खास वाटतो. तुमचा एकही वाढदिवस माझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय आणि हृदयात वेदना झाल्याशिवाय गेला नाही. आज मी कदाचित तुम्हाला मिठी मारू शकणार नाही किंवा तुमचा आवाज ऐकू शकणार नाही. पण मी अजूनही पूर्वीप्रमाणेच “वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबा” असेच म्हणते… माझ्या ह्या शुभेच्छा तुम्ही कुठून तरी ऐकू शकाल, अशी मला आशा आहे. तुमची लहान मुलगी मोठी झाली आहे, मी काही गोष्टी साध्य केल्या आहेत आणि तुम्ही ज्या वादळांना तोंड दिले आहे त्या वादळांना मी सुद्धा तोंड दिले आहे.
पण असा एकही क्षण जात नाही जात की, तुम्ही हे सर्व पाहण्यासाठी आणि माझ्या आनंदासाठी तुम्ही आज हवे होतात, अशी गोष्ट कायमच मला वाटते. मला तुमचे हास्य आणि तुमचा सल्ला मला कायमच आठवतो. पण त्याहूनही सर्वाधिक मला आठवतं ते, तुम्ही कसं सुरक्षित सांभाळलं, मला लहानाचं मोठं होताना पाहिलं आणि इतके मनापासून प्रेम केले याची मला कायम आठवण येते. ते प्रेम अजूनही माझ्यात मनात कायम आहे आणि ते नेहमीच राहील. आणि तुम्हाला कायम अभिमान वाटेल अशा पद्धतीने जगत राहीन. पप्पा, माझे तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. तुमची लहान मुलगी. अप्पू.”
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री झाली आई, दिला गोंडस बाळाला जन्म; जपानी भाषेत ठेवलं नाव