काही महिन्यांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. याच संदर्भात आता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. लॉरेन्स बिश्नोईचा सलमान खानला दुसऱ्यांदा मारण्याची योजना आखली होती. प्लॅन ए अयशस्वी झाल्यानंतर बिश्रोईट टोळीने प्लॅन बी तयार केला होता. ज्या अंतर्गत सलमानवर AK 47, M-16 आणि AK-92 सारखी शस्त्रे वापरली जाणार होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. त्याने सलमान खानच्या फार्म हाऊस आणि अनेक शूटिंग पॉइंट्सची रेसे केली होती. या चौघांनाही अत्याधुनिक विदेशी शस्त्रांनी सलमानवर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या प्रकरणात एक गंभीर बाब अशीही समोर येत आहे की, ही शस्त्रे पाकिस्तानच्या एका पुरवठादाराकडून आणली जाणार होती, ज्याचे नाव डोग्रा असल्याचे सांगण्यात आले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, सलमान खानचे वाहन थांबवणे किंवा त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकणे हा त्याचा उद्देश असावा.
[read_also content=”भाजपला तिसऱ्यांदा सत्ता मिळणार का? एक्झिट पोलचे अंदाज किती खरे? पाहा याआधीच्या निवडणुकीत काय घडलं? https://www.navarashtra.com/india/exit-poll-2024-in-marathi-bjp-vs-india-lok-sabha-election-result-predictions-541108.html”]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीशी संबंधित सुमारे 15 ते 20 लोक होते. जे सलमानच्या निवासस्थानाभोवती हल्ला करण्याच्या योजनेत सहभागी होते. हल्ल्यानंतर आरोपींनी कन्याकुमारीमार्गे श्रीलंकेला पळून जाण्याची योजनाही आखली होती. या प्रकरणात 17 आरोपींची नावे असून त्यापैकी 4 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ न्हवी, रिजवान खान उर्फ जावेद खान आणि वसीम चिकना अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलमधून काही व्हिडिओही जप्त केले आहेत.
मुंबई पोलिसांचे मोठे यश
हे चौघेही पनवेलमध्ये संधी मिळताच सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट रचत होते. 014 एप्रिल 2024 रोजी लॉरेन्स गँगशी संबंधित शूटर्सनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे दोन अज्ञातांनी हवेत 3-4 राऊंड गोळीबार करून दुचाकीवरून पळ काढला. सलमानच्या अपार्टमेंटबाहेरही गोळ्यांच्या खुणा आढळल्या. त्यावेळी त्यांच्या बाल्कनीच्या जाळ्यात गोळी घुसली होती.