मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) ॲक्शन, रोमँटिक, सत्य घटनांवर आधारित चित्रपट (Movies) हिंदी चित्रपटसृष्टीला देणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Director Ram Gopal Varma) खूप मोठ्या प्रदीर्घ कालावधी नंतर एक चित्रपट घेऊन येत आहेत.
मार्शल आर्टवर (Marshal Art) आधारित या चित्रपटात एका मार्शल आर्टिस्टच आयुष्य दाखवण्यात आलं आहे. पूजा भालेकर (Pooja Bhalekar) ही अभिनेत्री या चित्रपटातून बॉलिूडमध्ये येण्यास तयार आहे. पूजा स्वतः मराठी असून चित्रपटातही ती मराठी मुलीची भूमिका साकारत आहे.
पूजा तिच्या पहिल्या चित्रपटासाठी फार उत्सुक आहे. स्वतः उत्तम मार्शल आर्टिस्ट असलेल्या पूजाला मराठी चित्रपटसृष्टीनही भुरळ घातलीये. मराठीमध्ये दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनत असून ते आवडतात असं ती म्हणाली आणि संधी मिळाल्यास नक्की मराठी चित्रपटात काम करणार असे तिने सांगितले.