Malayalam Actor Shine Tom Chacko Arrested By Kerala Police In Drug Case
केरळ पोलिसांनी सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाको (Shine Tom Chacko) याला अटक केली आहे. दरम्यान, अभिनेत्याला पोलिसांनी ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच शाईन टॉम चाकोची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल. अलीकडेच, अभिनेत्री विन्सी अलोशियस हिने अभिनेता शाईन टॉम चाकोविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती. अभिनेत्याने ड्रग्जच्या नशेत असताना सेटवर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा तिने खुलासा पोलिस तपासात केला.
पोलिसांच्या ड्रग्स विरोधी कारवाईपासून वाचण्यासाठी अभिनेता काही दिवसांपूर्वी फरार झाला होता. कोचीतील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारून त्याने पळ काढला होता. पण शाइनला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री कोचीतल्या एका हॉटेलमध्ये ड्रग्स विरोधी विशेष पथकाने (DANSAF) छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान, शाइन टॉम चाको तिसऱ्या मजल्यावर होता. पोलिसांची उपस्थिती लक्षात येताच, त्याने खिडकीतून उडी मारून खाली असलेल्या एका पत्र्यावर उतरण्याचा प्रयत्न केला.
‘तुम्हारी आँखे है या छुरी, बडे गहरे घाव किया करते है..’ दागिन्यांमध्ये सजले टिनाचे तेज!
पत्रा तुटल्यामुळे तो थेट दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्विमिंग पूलमध्ये पडला आणि नंतर जिन्याचा वापर करून हॉटेलमधून पळून गेला. शाइन जरी पळाला असला तरीही पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता शाईन टॉम चाकोविरुद्ध पोलिसांनी नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याच्या कलम २७ (कोणत्याही अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थाचे सेवन) आणि २९ (अपमानास्पद वागणूक आणि गुन्हेगारी कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्याळम अभिनेत्याला नोटीस बजावल्यानंतर एका दिवसातच कोची शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
बॉलिवूड गाजवणारा अवलिया भूषण पटेलचं मराठी फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण
त्या नोटिशीमध्ये शाईन टॉमला ड्रग्ज विरोधी छाप्यादरम्यान हॉटेलमधून पळून गेल्याच्या घटनेसंदर्भात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. पोलिसांनी त्याची चार तास चौकशी केली. त्या हॉटेलमध्ये ड्रग्ज वापरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही घटना एर्नाकुलम उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा शाईन टॉम चाकोला कळले की पोलिसांचे पथक हॉटेलवर छापा टाकण्यासाठी आले आहे, तेव्हा त्याने प्रथम त्याच्या खोलीच्या खिडकीतून दुसऱ्या मजल्यावर उडी मारली आणि नंतर पायऱ्यांवरून पळून गेला. पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज देखील सापडला ज्यामध्ये चाको पायऱ्यांवरून खाली धावताना दिसत होता. त्याच वेळी, विन्सीने शाईन टॉम चाकोवर ड्रग्जच्या प्रभावाखाली असताना तिच्या ड्रेसला स्पर्श केल्याचा आरोप केला होता. तिने असेही म्हटले की ती त्याच्यासोबत कधीही काम करणार नाही.