Actor Milind Gawali Shared Instagram Post In Suraj Chavan Zapuk Zupuk Movie
‘बिग बॉस मराठीचा ५’ चा विजेता सूरज चव्हाण आता लवकरच ‘झापूक झुपूक’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाची घोषणा ‘बिग बॉस मराठीचा ५’च्या ग्रँड फिनालेवेळी करण्यात आली होती. ही घोषणा स्वत: दिग्दर्शक केदार शिंदेंनी केली होती. आता हा चित्रपट शुट करुन तयार असून येत्या २५ एप्रिलला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे करत असून निर्मिती जिओ स्टुडिओज करतेय. सध्या या चित्रपटाचा पोस्टर, ट्रेलर आणि गाणी कमालीचे सुपरहिट ठरताना दिसत आहे. चित्रपटात अभिनेता सूरज चव्हाण, जुई भागवतसह दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
दरम्यान, आता केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापूक झुपूक’ चित्रपटाला अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना अभिनेते मिलिंद गवळी यांनी सूरज चव्हाणबद्दल एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
बॉलिवूड गाजवणारा अवलिया भूषण पटेलचं मराठी फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण
चित्रपटाबद्दल आणि चित्रपटातील कलाकारांबद्दल शेअर केलेल्या पोस्टमध्ये मिलिंद गवळी म्हणतात, “निर्मळ, निरागस, मनाने चांगला, प्रेमळ, जिद्दी, मोठी मोठी स्वप्न पाहणारा, कधीही हार न मानणारा, स्वतःचे ठाम विचार असणारा, लहान वयात आई-वडिलांचं छत्रछाया हरवल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणारा, humiliation rejection पचवून त्यावर मात करणारा, आपल्या पाचही बहिणींवर खूप खूप माया करणारा, स्पष्ट शब्द उच्चारता न येता मनातल्या भावना अचूक व्यक्त करणारा, स्वतःची एक वेगळी style निर्माण करणारा, हिंदी आणि दक्षिणातल्या सुपरस्टार्स पेक्षा भारी swag असलेला सुरज चव्हाण… काही महिन्यापूर्वी “झापुक झूपुक” चित्रपटाच्या स्क्रिप्ट रिडिंगसाठी यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये पहिल्यांदा मी सुरजला भेटलो आणि आमच्यात फक्त hi,hello आणि नमस्कार झालं, तो एक लाजरा मुलगा आहे असं मला भासलं. माझ्या मनात एक शंका आली की या सिनेमातला मध्यवर्ती सशक्त रोल याला झेपेल का? केदार शिंदे यांनी मोठं शिवधनुष्यच उचलं आहे, सुरजशी माझी दुसरी भेट costume trialच्या दिवशी अंधेरीच्या स्टुडिओमध्ये झाली, त्यादिवशी मला बघताच त्यांनी एक छानशी घट्ट प्रेमळ मिठी मारली, तो आता थोडा खुललेला दिसला, त्याच्याशी तिसरी भेट शूटिंग लोकेशनच्या ठिकाणी वाई मध्ये झाली आणि तेव्हा तो मला खूप confident दिसला, आम्ही भेटताच क्षणी परत एकदा एकमेकांना घट्ट मिठी मारली, त्या मिठी मध्ये खूप warmth आणि purity होती, जी या सिनेमा क्षेत्रात खूप कमी अनुभवायला मिळते, अनेक वर्षांमध्ये मी formality च्या मिठ्या, hugs, देखल्या देवा दंडवत, खोट्या smiles, पाठ फिरताच एकमेकांना नाव ठेवणे, त्यात सुरज सारखी निर्मळ माणसे भेटले की मनाला खूप छान वाटतं, shooting set वर त्याच्याशी बोलताना तो म्हणाला, “या सिनेमात काम करायची त्याला भीती वाटत होती, दडपण आलं होतं, केदार सर आहेत ना मग मी करू शकतो, हार मानायची नाही” आणि खरंच डबिंगच्या वेळेला त्याचं काम बघितलं आणि मी थक्कच झालो, फारच सुंदर अभिनय केला आहे त्याने, जिद्द, कष्ट करायची तयारी, आणि खूप नम्रता, या मुलांमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा इतका positive attitude, माझी मनापासून इच्छा आहे मायबाप प्रेक्षकांनी त्याला भरभरून यश द्यावं, त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्याला यश नक्की मिळणार. सुरज बरोबर “झापुक झुपूक” मध्ये अजून काही young talented कलाकार आहे, जुई भागवत, इंद्रनील कामत, पायल जाधव, हेमंत फरांदे आणि अजून सहा चिल्ले पिल्ले आहेत. या सगळ्यांची कामं प्रेक्षकांना खूप आवडतील, या गोड पोरांना, @jiostudios team ला, केदारजी शिंदेच्या टीमला, माझ्या झापुक झुपूक सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.”