(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीने या आठवड्याचा गणपती स्पेशल भाऊचा धक्का चांगलाच गाजवताना दिसले. रितेश देशमुखने स्पर्धकांसोबत चांगलीच मज्जा मस्ती केली. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून घन:श्याम दरवडेने निरोप घेतला. त्याचा या घरातील प्रवास संपला. अशातच याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात या सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एण्ट्री देखील झाली. संग्राम चौगुले असे या स्पर्धकाचे नाव असून, संग्रामाचे सोशल मीडियावर जास्त फॅन फोल्लोविंग देखील आहे. संग्राम आता या बिग बॉसच्या घरात कसा खेळ खेळणार आणि चाहत्यांची मन जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्याने बिग बॉसच्या घरात एण्ट्री करताच अरबाज पटेलला धमकी देखील दिली आहे.
संग्रामने अरबाजला घरात येताच दिली धमकी
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये संग्राम आपल्या नावाची पाटी घेत घरात एन्ट्री करताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत संग्रामने घरात एन्ट्री घेतली आहे. घरात येताच संग्रामने अरबाजला धमकी दिली आहे. आतापर्यंत तू जी पॉवर दाखवलीस ती वीक माणसाला दाखवली आहेस, असं घरात येताच संग्राम अरबाजला म्हणताना दिसला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली असून, हा स्पर्धक संग्राम चौगुले आहे. आता नव्या सदस्याच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलतील ? नात्यांमध्ये किती बदल होतील ? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येईल आणि कोण सेफ होईल ? हे पाहण्यासाठी ‘बिग बॉस’ प्रेमी उत्सुक आहेत. हे सगळं बघताना चाहत्यांना मज्जा येणार आहे. तसेच संग्रामनंतर आणखी कोण कोणते स्पर्धक वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतील यासाठी देखील चाहत्यांची उत्कंठता वाढली आहे.
हे देखील वाचा- Sai Tamhankar : सर से पैर तलक बेतहाशा हुस्न से भरी, हाय मेरी परमसुंदरी
पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री संग्राम चौगुले आहे कोण?
बॉडीबिल्डर संग्राम चौगुले सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. त्याचे दीड मिलियन फॉलोअर्स आहेत. फिटनेसवर त्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आजवर त्याने अनेक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याने सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राच्या किताबावर आपले नाव कोरले आहे. त्याची स्वत:ची एक आलिशान जीमदेखील आहे. आता तो बिग बॉसच्या घरात कसा खेळणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.