(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत धक्का बसला. वयाच्या ७८ व्या वर्षी ज्योती चांदेकर अभिनय क्षेत्रात सक्रीय होत्या. स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत त्या पूर्णआजीच्या भूमिकेत दिसल्या. प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. ठरलं तर मग मधील पूर्णाई प्रेक्षकांच्या गळ्यातील राणी झाली. पूर्णाईने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण ज्योती चांदेकर यांच्या अचानक निधनाने मालिकेच्या संपूर्ण टीमला धक्का बसला आहे. ज्योती चांदेकर यांनी पूर्णाई इतकी चोख साकारली होती की त्यांच्याशिवाय या भुमिकेसाठी प्रेक्षक कोणालाही पाहू शकत नाही. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अशाच प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या.
Bigg Boss 19 : कॅप्टन्सी टास्कमध्ये स्पर्धक भिडले, मृदुल तिवारीच्या तोंडाला लागला मार! पहा Promo
परंतु मालिका म्हटल्यावर नक्कीच त्याची कथा पुढे जाणार. ठरलं तर मग मालिका सध्या महत्त्वाच्या वळणावर सुरु आहे. या वळणावर पूर्णाईची भूमिका अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णाआजी कोण साकारणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता स्वतःच अभिनेत्री जुई गडकरीने याबद्दल अपडेट शेअर केली आहे.
जुई गडकरीने नुकतंच आस्क मी एनिथिंग सेशन सोशल मीडियावर शेअर केले. त्यात तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. ज्यात एक प्रश्न नव्या पूर्णाआजीबद्दल होता. पूर्णा आजीच्या रोलसाठी कोणाची एन्ट्री होणार आणि कधी? असा प्रश्न जुईला विचारण्यात आला. याचं उत्तर देत जुईने लिहिले, ‘याबद्दल मला खूप प्रश्न विचारले जात आहेत. आम्ही सगळे तिला खूप मिस करत आहोत. पण आता नवीन कोण येणार हे सगळं आम्हालाही माहिती नाहीये. या सगळ्या गोष्टी चॅनलच्या डिसिजनवर आहेत. सो चॅनेलकडून अधिकृतरित्या काही कळल्याशिवाय कोणीतरी युट्यूब, इन्स्टा, एफबीला येणाऱ्या न्यूजवर विश्वास ठेवू नका.’ असे अभिनेत्रीने म्हटले आहे.
अभिनेता नील नितीन पोहचला लालबागचा राजाच्या दरबारात, सनी देओल-अनन्या पांडेने केली बाप्पाची आरती
जुई गडकरीने या आधी अनेकदा ज्योती चांदेकर यांच्याबरोबरच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. दोघींचं अगदी आजी आणि नातीसारखं नातं होतं. जुईने या सेशलनमध्ये हेही सांगितलं की, मी तिच्यासाठी अळूचं फदफद केलं होतं जे तिला खूप आवडलं होतं. तसेच जुई गडकरीने ज्योती चांदेकर एक भावुक पोस्ट देखील शेअर केली होती.
huijui