(फोटो सौजन्य - Instagram)
मराठी चित्रपटांना योग्य ते अनुदान मिळावं यासाठी प्रसाद ओक आणि महेश कोठारे यांनी कठोर प्रयत्न करून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून सात करोड इतकी रक्कम मिळावी अशी मागणी केली होती आणि आजच्या नव्या माहिती नुसार महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी सिनेमाना तब्बल २.५० करोड रुपये अनुदान देण्यात यावं यावर शिक्कमोर्तब केला आहे. अनेकदा सरकारकडे पाठपुरावा करून ही रक्कम आता मराठी चित्रपटनिर्मिती साठी मिळणार आहे. वर्षभरात ३ चित्रपटांना अडीज कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचं आज जाहीर झाले आहे.
आपल्या मराठी सिनेमासाठी हक्काने लढणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक यांच्या या कृतीचा सगळ्यांना अभिमान तर आहे पण आता हे अनुदान योग्य तऱ्हेन कसं वापरता येईल यावर देखील चर्चा लवकरच होणार आहे. प्रसाद ओक हे कायम मराठी चित्रपटांना योग्य न्याय मिळावा यासाठी वारंवार भाष्य करताना दिसले आहेत आणि आजची ही गोष्ट मराठी चित्रसृष्टीसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. प्रसाद ओक आधीपासून या कमिटी वर आहेत आणि कायम मराठी इंडस्ट्रीसाठी काय वेगळं करता येईन याकडे त्यांचा कल असताना आज मराठी सिनेमाला हे नवं अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी कायम सरकारकडे पाठपुरावा देखील केला होता.
प्रसाद ओक या बद्दल बोलताना म्हणाले “‘गेली अनेक वर्ष मनोरंजनसृष्टीत काम केल्यानंतर अलीकडच्या वर्षात सिनेदिग्दर्शक आणि आता निर्मिती सुरु केल्यांनतर सिनेनिर्मिती आर्थिक बाजू अधिक जवळून अभ्यासता आली. दरम्यान सांस्कृतिक विभाकडून सिनेमांना मिळणारे तीस-पन्नास लाखांचे मिळणारे अनुदान अपुरे आहे हे निदर्शनास आले. आजचे सिनेमांचे निर्मिती मूल्य हे कोटीं रुपयांच्या घरात आहे. यासंदर्भात अलीकडच्या वर्षात आम्ही सांस्कृतिक मंत्रांशी चर्चा करत होतो. त्यांनतर सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुढाकार घेऊन आमची समिती नेमली ज्यात मी आणि ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे होते.’ असे ते म्हणाले.
पुढे अभिनेता म्हणाला, ‘कला, क्रिडा, साहित्य, राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या जीवनपटासाठी शासनाने अनुदानाची मोठी द्यावी अशी शिफारस आम्ही केली. एका सिनेमासाठी ती रक्कम ७.५ कोटी रुपये इतकी असावी असा आमचा विचार होता. या शिफारशींवर विचार करुन शासनाने शासन निर्मिती सिनेमांसाठी १० कोटी आणि खाजगी सिनेनिर्मिती संस्थेस २.५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहेत. हा निर्णय स्वागताहार्य आहे. जेणेकरून उच्चतम, दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती होईल. यातून सकस दर्जाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येतील. या मराठी सिनेमांच्या हितकार्यात मला खारीचा वाटा उचलता आला याचा मला आनंद आहे” असे प्रसाद ओकन यांनी सांगितले.
कायम मराठी चित्रपटांना आणि प्रेक्षकांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळाव यासाठी चर्चेत राहून काम करून प्रसाद ओक यांनी सरकारला अनेकदा विनंती करून त्यांचा पाठपुरावा केला आहे आणि म्हणून आजच्या या नव्या अनुदानाच श्रेय हे प्रसाद ओक यांना जाते आहे. महाराष्ट्र शासनाने हे नव अनुदान देऊन नक्कीच मराठी चित्रपटांसाठी एक वेगळा स्टँड घेतला आहे यात महाराष्ट्र सरकार सोबतीने सांस्कृतिक मंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवार सर यांच्या सक्रिय सहभागाने कलाकारांच्या मागण्या समजून घेऊन सबंध मराठी चित्रपट सृष्टीसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
हे देखील वाचा- श्रद्धा कपूरचा सिंपल- डिंपल अंदाज; नव्या फोटोंमध्ये दिसतेय खास!
प्रसाद वैविध्यपूर्ण भूमिका साकारत असताना त्यांच्या या नव्या भूमिकेचं तोंड भरून कौतुक होत आहे. ही गोष्ट फक्त मराठी चित्रपटांसाठी नाही तर संपूर्ण मराठी इंडस्ट्रीसाठी महत्वपूर्ण आहे आणि म्हणून प्रसाद ओक यांनी वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करून आज मराठी सिनेमासाठी नव अनुदान मिळवून दिले आहे.