(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
२०२४ वर्षात ज्याने दुहेरी भूमिका साकारून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं असा अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी पुन्हा एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. “जिलबी” गोड ही.. गूढ ही” अशी कल्पक टॅगलाईन असलेला हा चित्रपट नक्कीच काहीतरी वेगळा असणार यात शंका नाही. स्वप्नीलने सोशल मीडिया वर पोस्ट करून त्याचा नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच रहस्याचा थरार घेऊन येणारा जिलबी चित्रपट नक्की काय असणार या बद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये स्वप्नील खूप जास्त वेगळ्या लूक मध्ये दिसतोय आणि या नव्या लूकची जोरदार चर्चा देखील होताना दिसतेय.
जिलबी मधल्या भूमिके बद्दल बोलताना अभिनेता स्वप्नील जोशीने सांगितले की, ‘गेली काही वर्ष मी सातत्याने प्रयत्न करतोय की वेगळे चित्रपट आणि वेगळ्या गोष्टी असलेले चित्रपट करावे कारण मला स्वतःला वेगळ्या गोष्टी बघण आणि करण यात मज्जा येते कधीतरी हे वेगळेपण यशस्वी ठरत कधी ठरत नाही पण वेगवेगळ्या गोष्टी करण्यातल सातत्य मी जपतोय याचा आनंद आहे. अश्या प्रयोगशील भूमिकांमधून वाळवी असेल किंवा आता जिलबी असे चित्रपट घडतात म्हणून काम करताना देखील तितकीच मज्जा येते. जिलबी बद्दल सांगायचं झालं तर हा एक थरार नाट्य आहे कमालीचे कलाकार आहेत आणि कहाणी मध्ये ट्विस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. माझी भूमिका ही आधीच्या सगळ्या रोल पेक्षा नक्कीच खूप वेगळी आहे त्यामुळे मला देखील खूप उत्सुकता आहे. पोस्टरला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला असून ही एक अंडर कॉपची गोष्ट आता तुम्हाला सांगण्यासाठी सगळ्या भूमिकांना भेटवण्यासाठी आम्ही सगळेच खूप वाट बघतोय”. असे त्याने सांगितले.
नवा लूक आणि नवा चित्रपट घेऊन स्वप्नील नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार तर आहे पण सोबतीने स्वप्नीलने या वर्षात बॅक टू बॅक वेगवेगळ्या विषयावर आधारित वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आणि ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. निर्मितीच्या सोबतीने अभिनय करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सुपरस्टार स्वप्नील येणाऱ्या काळात अजून वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे. आणि त्याच्या हे आगामी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये आतुरता निर्माण झाली आहे.
“पाच वर्ष सुरू असलेला हा प्रवास…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट…
तसेच येणाऱ्या काळात अभिनेत्याचा निर्माता म्हणून आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्नील जोशी निर्मित “सुशीला – सुजीत” हे या चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. “सुशीला- सुजीत” हा नवा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नीलच्या सोबतीने अभिनेता प्रसाद- मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि निलेश राठी देखील या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मराठीमधील बडे कलाकार या चित्रपटासाठी निर्माते झाले असून आता या चित्रपटाची स्टार कास्ट काय असणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.