कमळीला सरोजच्या कॅडनॅपिंगबाबत काहीच माहित देखील नाही. अन्नपुर्णा आजीने कामिनीला वचन दिलं असतं पुढच्या सहा महिन्यात जर महाजनांची मोठी नात आली नाही तर सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावे करणार. त्यामुळे राजन आणि अन्नपूर्णा आजी आपल्या माणसांना कामाला लावतात. याच कारणामुळे कामिनी देखील सरोजचा शोध घेत असते. दुर्देवाने सरोज पहिलेच कामिनीच्या तावडीत सापडते. कामिनी सरोजकडून सत्य वधवून घेण्यासाठी तिला खूप मारहाण करते. तिला जीवे मारण्याची धमकी देखील देते. मात्र अद्यापही सरोज कमळीबाबत कामिनी काहीही सांगत नाही.
सरोजला किडनॅप केल्यानंतर कामिनी म्हणते की सांग कुठे लपवून ठेवलीस तुझ्या मुलीला पण सरोज सगळी मारहाण सहन करते पण काही बोलत नाही. तर दुसरीकडे अन्नापुर्णा आजीला कमळी शब्द देते की, वाईट प्रवृत्तीचा फडशा पाडून मी तुम्हाला तुमची नात मिळून देणार. तर दुसरीकडे कामिनी म्हणते की आता नाही नात राहणार ना नातं. कामिनी सरोजच्या मानेवर कोयता पकडणार तितक्यातच कमळी कामिनीचा हात पकडते. आणि तिला मोठा धक्का बसतो. तिला समोर तिची आई दिसते. याचा नुकताच प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. हा विशेष भाग उद्या म्हणजेच 19 तारखेला प्रदर्शित होणार आहे. कमळीला तिच्या वडिलांचं सत्य सरोज सांगेल का ? कमळीला तिच्या हक्काचं कुटुंब मिळेल का ? हे पाहणं आता विशेष ठरणार आहे.






