सौजन्य : Star pravah
गेले कित्येक दिवस माया माक्समॅन बनून रणदिवे कुटुंबातील प्रत्येकाला एकमेकांपासून तोडण्याचा प्रयत्न करत आहे. या माक्समॅनच्या कारस्थानाला यश मिळवू द्यायचं नाही म्हणून जानकी जीवाचं रान करते. घरातल्या सगळ्या गोष्टी मास्कमॅनला कळतातच कशा ? हे काही केल्या रणदिवेंना कळत नाही. मात्र आजच्या भागात मायाचं सत्य उघड होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मास्कमॅन बनून माया अवंतिकाला फोन करुन भेटायला बोलावून घेते. त्यानंतर अवंतिकाला रणदिवे हॉस्पीटवमध्ये दाखल करतात कारण तिची तब्येत बिघडते. त्यावेळी सौमित्र जानकी म्हणतो की हे तुझ्यामुळे झालं अवंतिकाच्या या अवस्थेला तू जबाबदार आहेस. यावर जानकी म्हणते की, माझा आणि अवंतिका काय प्लॅन आहे ते आमच्या दोघींशिवाय कोणालाही ठाऊक नाही. त्यावर लगेच सारंग म्हणतो की, माहित होतं मायाला तुमच्या प्लॅनबद्दल मीच सांगितलं होतं. त्यावेळी जानकीला संशय येतो की मायाचं मास्कमॅन आहे का ?
तर मायाचा जानकीला आलेला संशय आणि त्यानंतर आता जानकी काय पाऊल उचलणार हे आजच्या भागात पाहता येणार आहे. जानकी समोर मायाचा खरा चेहरा समोर येईल का ? मायाला ऐश्वर्याची असलेली फूस आणि मकरंद जिवंत आहे हे सत्य जानकी कसं शोधून काढेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.






