(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
वैशाली सामंत ही एक सुप्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका, संगीतकार आणि गीतकार आहे, जी प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि संगीत उद्योगातील तिच्या कामासाठी ओळखली जाते. वैशालीचा जन्म २५ एप्रिल १९७४ रोजी मुंबई येथे झाला. आज गायिका २५ एप्रिल रोजी स्वतःचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. वैशाली सामंतच्या कारकिर्दीची सुरुवात तिच्या पहिल्या अल्बमने झाली, ज्याने तिला ओळख मिळवून दिली आणि मराठी संगीत क्षेत्रात तिला स्थापित केले. त्यानंतर तिने हिंदी, बंगाली आणि मराठीसह विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत आणि तसेच मराठीत वैशालीने २००० हून अधिक गाणी गायली आहेत. आणि या मराठी सिनेविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गायिकेला कधी लागली संगीताची आवड?
गायिका वैशाली सामंतला लहानपणापासूनच संगीताची आवड निर्माण झाली होती. गायिकेने अनेकदा स्थानिक गायन स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन ती आवड जपली आहे. गायिकेला तिच्या आयुष्यातील पहिली मोठी संधी पहिल्या संगीत अल्बमच्या प्रकाशनासोबत मिळाली, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या अल्बममुळे वैशालीला मराठी संगीत उद्योगात चांगली ओळख मिळाली आणि ती प्रसिद्धीच्या झोतात आली.
वैशालीची गायक क्षेत्रातील कारकीर्द
प्रसिद्धीनंतर वैशालीने पुढे अनेक हिंदी चित्रपटामध्ये स्वतःच्या आवाजाची जादू दाखवली. तिने लगान, ताल आणि साथिया सारख्या चित्रपटांमध्ये ए.आर. रहमान सारख्या संगीतकारासोबत गाणी गायली. आणि त्यानंतर तिने हिंदी सिनेमासृष्टीत स्वतःचे नाव मिळवले. वैशाली सामंतने पद्मश्री लालू प्रसाद यादव, दिल जो भी कहे… आणि मिर्च यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही गाणी गायली आहे. तिचे सर्वात प्रसिद्ध गाणे ए.आर. रहमान यांच्या साथियामधील “चलका रे” हे झाले. या गाण्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि चाहत्यांच्या ते पसंतीस पडले. नंतर, गायिकेला एमटीव्ही आशिया संगीत पुरस्कार आणि अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवासह अनेक पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले.
पहलगाम हल्ल्यानंतर Arijit Singh ने चेन्नईतील संगीत कार्यक्रम केला रद्द, काय म्हणाला गायक?
वैशाली सामंत पुढे टेलिव्हिजनवरील रिॲलिटी गायन स्पर्धा कार्यक्रमांमध्ये जज म्हणून प्रेक्षकांना दिसली. तिने ‘सा रे ग म प मराठी’, ‘सा रे ग म प मराठी लिल चॅम्प्स’, ‘मी होणार सुपरस्टार’ यांसारखे संगीत शोमध्ये तिने जज म्हणून आपली कामगिरी पार पडली आहे. वैशालीने या मराठी चित्रपटसृष्टीत ‘नवरी मांडवा खाली’, ‘कोंबडी पालाली’, ‘राणी माझ्या मळ्यामंदी’, ‘नाच ग घुमा’, ‘गुलाबाची काळी’ आणि ‘ऐका दाजीबा’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी दिली आहे. ‘ऐका दाजीबा’ हे गाणं अजूनही प्रेक्षकांना थिरकण्यास भाग पाडते.
वैशाली सामंतचे वैयक्तिक आयुष्य
वैशाली सामंतचे लग्न दत्तात्रेय सामंत यांच्याशी झाले आहे आणि या दोघांनाही एक मुलगा आहे. ज्याचे कुशाण सामंत आहे. गायिका अनेकदा कुटुंबासोबत फिरताना, मराठी सण साजरा करताना दिसली आहे. सोशल मीडियावर गायिकेचा चांगला चाहता वर्ग आहे. तसेच ती अनेक वेळा कुटुंबासोबतचे फोटो शेअर करताना दिसत असते.