फोटो सौजन्य - Social Media
मराठी सिनेसृष्टीचे जेष्ठ अभिनेते तसेच हिंदी सिनेमांमध्ये आपली मराठमोळी छाप उमटवणारे सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा चित्रपट अजूनही मराठी जणांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर पकडून आहे. या चित्रपटाने मराठी माणसाच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. या चित्रपटही सगळ्या कलाकारांचा अभिनय, चित्रपटातील गाणे, निसर्ग अगदी अष्टपैलू म्हणजे काय असते? याची उत्तम व्याख्या म्हणजे हे चित्रपट होते. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनात पुन्हा तेच उत्साह जागे करून स्थान मिळवण्यासाठी २० वर्षांनी चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सप्टेंबरच्या २० तारखेपासून मराठी सिनेसृष्टीला नवी दिशा देण्यासाठी ‘नवरा माझा नवसाचा २’ सज्ज आहे. चित्रपट राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित केले जाणार असून प्रेक्षक नक्कीच भरभरून प्रतिसाद देणार असल्याचे चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
जुलैच्या १९ तारखेला, अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर ‘नवरा माझा नवसाचा २’ चे अनाउन्समेंट व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये मराठी सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते अशोक सराफ आधी एका बस स्टॅन्डवर बस कंडक्टरच्या वेषात म्हणजेच नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील त्यांच्या मूळ भूमिकेत दिसून येतात. पुढे, पिलर पार करताच ट्रॅजिशन नंतर अशोक सराफ रेल्वेच्या टीटीच्या भूमिकेत बदलून जातात. या व्हिडिओतून खात्री होते कि, नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भागातील प्रवास रेल्वेतून होणार असून अशोक सराफ टीटीच्या भूमिकेत असणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाचा अनाउन्समेंट टीझर मराठी सिनेमातील २४ तासात सगळ्यात जास्त पाहिला जाणारा टीझर बनला आहे. व्हिडिओला २४ तासात एकूण 12.3 M लोकांनी पाहिले आहे. यावरून लोकांमध्ये सिनेमाचा क्रेझ किती आहे? याचा अंदाज बांधता येतो.
इंड्यस्ट्रीतील अनेक परीक्षकांचे असे ही म्हणणे आहे कि, दाक्षिणात्य सिनेमांसारखे यंदा ‘नवरा माझा नवसाचा २’ या मराठी चित्रपटासाठीसुद्धा ऍडवान्सड बुकिंग भरभरून पाहायला मिळेल. सिनेमात सचिन पिळगावकर आणि अशोक सराफसह, सुप्रिया पिळगाववकर, निवेदिता सराफ, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव अली अजगर पाहायला मिळणार आहे. अशा सुपरहिट कास्टसह सिनेमादेखील सुपरहिट होण्याचा अंदाज चित्रपट रिलिज होण्याच्या अगोदरच लावले जात आहेत.