आऊट कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची मुख्य भुमिका असलेल्या फिल्म मेरी ख्रिसमस चित्रपटच्या रिलीजसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचे दुसरे गाणे नजर तेरी तुफान रिलीज केलं आहे. या गाण्यात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
[read_also content=”1 लाखाचं बक्षीस असलेल्या गोरखपूरच्या कुख्यात गुंडाच एन्काऊंटर, हत्येसह 35 गुन्हे होते दाखल! https://www.navarashtra.com/crime/gangstar-vinod-upadhyay-killed-in-encounter-by-stf-in-uttar-pradesh-nrps-495147.html”]
कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. दोघांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रीराम राघवन दिग्दर्शित या थ्रिलर चित्रपटात कतरिना कैफ प्रथमच विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करत आहे.
निर्मात्यांनी ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटातील दुसरे गाणे ‘नजर तेरी तुफान’ आज 4 जानेवारी रोजी रिलीज झाले आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची जबरदस्त रोमँटिक केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळते. या गाण्यात हे स्टार्स कधी एकत्र प्रेमात पडताना तर कधी भांडताना दिसत आहेत.
‘मेरी ख्रिसमस’चे हे गाणे वरुण ग्रोव्हरने लिहिले असून पापोनने त्याला आवाज दिला आहे. हे गाणे पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘कॅट आणि विजयची अप्रतिम केमिस्ट्री पाहण्यासाठी या चित्रपटाची वाट पाहू शकत नाही.’ दुसर्याने आपला उत्साह शेअर केला आणि लिहिले, ‘प्रीतम आणि पापोन बर्याच काळानंतर, जादुई, आश्चर्यकारक.’
कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची मुख्य भुमिका असलेल्या या चित्रपटात संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय राधिका आपटे आणि अश्विनी काळसेकर या चित्रपटात छोट्या भूमिका साकारत आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि रमेश तौरानी, संजय राउत्रे, जया तौरानी आणि केवल गर्ग निर्मित, हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.