मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (kangana ) सूत्रसंचालन करत असलेला ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो येत्या २७ फेब्रुवारीपासून प्रसारित होणार आहे. याकार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा दिल्या जाणार नाही. इतकेच नाही तर एकाच लॉकअपमध्ये दोन सेलिब्रिटींना ठेवले जाणार असून, त्यांचे हात एकमेकांना बांधले जाणार आहेत. कार्यक्रमात कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार, याबाबत गुप्तता पाळली आहे. असं असलं तरी कंगनाला कुणाकुणाला लॉकअपमध्ये टाकायचे आहे? हे तिने सांगितले आहे.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पत्रकारांनी कंगनाला काही प्रश्न विचारले. यात एक प्रश्न विचारण्यात आला की, या शोच्या तुरुंगात तिला कोणा कोणाला बघायला आवडेल? या प्रश्नाचं उत्तर कंगनाने अतिशय मजेशीर पद्धतीने दिले. ती म्हणाली,’सिनेसृष्टीतील ज्या लोकांना मला लॉकअपमध्ये टाकायचे आहे त्यात सर्वात पहिले नाव आहे ते माझ्या खास मित्राचे अर्थात करण जोहर चे(Karan johar) आणि त्यानंतर एकता कपूर‘ला (Ekta Kapoor) मला लॉकअपमध्ये टाकायला आवडेल .
कंगनाला ज्यांना तुरुंगात टाकायचे आहे, त्यामध्ये आमिर खान, (Amir Khan) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan )यांचेही नाव घेतलं. तसंच कंगनाने काही राजकीय नेते मंडळींनाही लॉकअपमध्ये ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. तिला नावे विचारली असता कंगनाने सांगितले की, ‘मी ते जाहीर करणार नाही. नाही तर माझ्यावर पुन्हा एकदा एफआयआर दाखल केली जाईल.’