झाकीर हुसैननंतर संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन
संगीसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे रविवारी (१५ डिसेंबर) रात्री दीर्घ आजारने निधन झाले. एका धक्क्यातून सावरत असताना संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गायक पंडित संजय राम मराठे यांचं निधन झालं आहे. संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि मुकुंद मराठे यांचे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ गायक, हार्मोनियम वादक संजय राम मराठे यांचे रविवारी (१५ डिसेंबर) रात्री ९.५५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले, ते ६८ वर्षांचे होते.
पंडित संजय राम मराठे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. झाकीर हुसैन यांच्यानंतर आता पंडित संजय राम यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. पंडित संजय मराठे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि रंगभूमीचा वारसा जपला आहे. आपल्या हार्मोनियम आणि सुरेल आवाजाने त्यांनी जगभर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. देश-विदेशातील अनेक मोठे सन्मान त्यांना मिळाले आहेत.
२०२४ ‘या’ मधील बेस्ट मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांचे जिंकलं मन, जे तुम्ही पाहायलाच हवेत
गायक पंडित संजय राम मराठे यांच्या पश्चात युवा तडफदार गायक भाग्गेश मराठे, प्राजक्ता मराठे, पत्नी, सूना नातवंडे असा परिवार आहे. २०२४ साली झालेल्या संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमात त्यांचा मुख्य सहभाग होता. आपले धाकटे बंधू गायक मुकुंद मराठे यांच्यासह त्यांनी संगीत मंदारमाला हे संगीत नाटक जन्मशताब्दी वर्षात साकारले होते आणि आज देखील त्याचे प्रयोग जोरदार चालू आहेत.