२०२४ 'या' मधील बेस्ट मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांचे जिंकलं मन, जे तुम्ही पाहायलाच हवेत
२०२४ हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवसंच शिल्लक राहिले आहेत. हे वर्ष खरंतर प्रत्येक गोष्टीसाठी स्पेशल ठरलं आहे. मुख्य बाब म्हणजे, चित्रपटासाठीही… २०२४ या वर्षात मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये २०२४ या वर्षात ५० हून अधिक चित्रपट रिलीज झाले आहेत. यामध्ये अनेक चित्रपटांचा समावेश झालेला आहे. २०२४ या वर्षांत रिलीज झालेले हे १० चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात पाहिले नसतील तर ते आता ओटीटीवर उपलब्ध आहेत, चला तर जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल…
बिष्णोई समाजाच्या बलिदानाची कहाणी येतय प्रेक्षकांच्या भेटीला, ‘साको 363’ चा थरारक टीझर रिलीज
फुलवंती- Phullwanti
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांचा ‘फुलवंती’ चित्रपट देखील या वर्षीच्या उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. प्राजक्ताचा महत्वकांक्षी ‘फुलवंती’ चित्रपट ५० दिवस थिएटरमध्ये चालला. हा चित्रपट तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळेल.
सत्यशोधक- Satyashodhak
देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ‘सत्यशोधक’ चित्रपट जानेवारी २०२४ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळेल.
किर्ती सुरेशने बॉयफ्रेंडसोबत गोव्यात बांधली लग्नगाठ, पाहा Photo
धर्मवीर २- Dharmaveer 2
‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या माध्यमातून दिघे साहेबांची विविध रुपं दाखवण्यात आली आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघे साहेब यात दिसतात. हिंदुत्त्वाविषयी थेट आणि आक्रमक भूमिका घेणारे साहेब यात दिसतात. म्हणूनच आता चित्रपटात काय कथानक उलगडणार याचं कुतूहल निर्माण झालं आहे. हा चित्रपट तुम्हाला ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.
नवरा माझा नवसाचा २- Navra Maza Navsacha 2
‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये स्वप्नील जोशी-हेमल इंगळे ही जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची जावई, मुलगी अशा भूमिकेत दिसणार आहे. सासऱ्यांनी ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला, तसा आता जावयाला फेडता येतो का? याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नवस फेडण्यासाठीच्या रेल्वे प्रवासात हिरे चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाचं कथानकही उलगडणार आहे. हा चित्रपटही तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळेल.
जुना फर्निचर- Juna Furniture
वृद्ध आई- वडील आणि दुरावलेला मुलगा यांच्या नात्यावर भाष्य करणारा ‘जुना फर्निचर’ चित्रपट आहे. . मुलगा आणि वडिलांच्या या कोर्टातील लढाईवर हा सिनेमा आधारित आहे. आई-वडील मुलांप्रती असलेल्या कर्तव्यात कधीच कमतरता ठेवत नाहीत पण तीच मुले आई-वडील म्हातारे झाल्यावर त्यांच्याकडे दुर्लक्ष का करतात? त्यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर का पडतो? हा प्रश्न सिनेमातून विचारला आहे. हा चित्रपट तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळेल.
‘अशोक मा.मा.’ मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…
घरत गणपती- Gharat Ganpati
‘घरत गणपती’ सिनेमातून एक वेगळा आणि महत्त्वाचा विषय हाताळला गेला आहे. कोकणात गणपतीनिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र येत असतात. असंच घरत कुटुंबही गणपतीच्या निमित्ताने या सिनेमात एकत्र आलेलं आहे. गणेशोत्सवाबरोबरच कुटुंबातील मतभेद आणि हेवेदावे यांवरही ‘घरत गणपती’ सिनेमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. संवाद आणि गाण्यांमुळे सिनेमाला वेगळाच टच मिळाला आहे. हा चित्रपट तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळेल.
घात- Ghaath
‘घात’ हा चित्रपट माओवादी बंडखोरांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, ज्यात सामान्य नागरिक, पोलिस आणि बंडखोर यांच्यातील तणावपूर्ण संघर्ष चित्रित केला आहे. हा केवळ एक चित्रपट नसून, एक अनुभव आहे. चित्रपटाची कथा, त्याचे चित्रण, त्यातील प्रत्येक पात्र सगळं इतकं खोलवर जाऊन बसतं की, प्रेक्षकांना स्वतः त्याच जंगलात, त्याच परिस्थितीत असल्यासारखं वाटतं. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात उलगडणारी ही कथा, प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण करते.
नाच गं घुमा- Nach Ga Ghuma
‘नाच गं घुमा’ या सिनेमाची कथा ऑफिस आणि घर हे दोन्ही सांभाळत संसाराची कसरत सांभाळणारी राणी आणि तिच्या संसारात हातभार लावत तिच्या घरी काम करणाऱ्या आशा ताई यांची गोष्ट चित्रपटात पाहायला मिळत आहे. मालकीण आणि मोलकरीण यांचं नातं, त्यांची मैत्री, त्यांची होणारी भांडणं आणि घरातील सगळ्यांचे त्यांच्याशी असणारे घट्ट बंध या चित्रपटातून अधोरेखित होतात. कॉमेडी पण तितकाच भावुक करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळेल.
पाणी- Paani
‘पाणी’ हा महाराष्ट्रातील पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणाची संघर्षगाथा चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात हनुमंत केंद्रे यांचे इतिहास घडवणारे कार्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाणी प्रश्नांमुळे गावातील अनेक कुटुंबे गाव सोडून जात असतानाच या तरुणाने गावातच राहून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. गावात पाणी नसल्याने त्याचे लग्नही होत नसल्याचे ट्रेलरमध्ये दिसतेय. त्यामुळे आता गावात पाणी आणण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या या तरुणाचा हा प्रवास कसा असणार, गावात पाणी येणार का? ज्या तरुणीवर त्याचे प्रेम आहे तिच्याशीच लग्न होणार का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेल. हा चित्रपट तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळेल.