प्रसाद-अमृता : प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख या बिग बॉस मराठी ४ मधील प्रसिद्ध आणि लाडक्या जोडप्याने अलीकडेच त्यांचे पहिले केळवण छोटेसे आणि आनंदात साजरे केले. रिऍलिटी शोममध्ये ते या खास क्षणापर्यंतच्या या जोडप्याच्या प्रवासाने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. अमृताने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना कळवले की ती आणि प्रसाद त्यांच्या पहिल्या केळवणाचा आनंद लुटणार आहेत. प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख या बहुचर्चित जोडप्यांने अलीकडेच त्यांच्या पहिल्या ‘केळवण’बद्दल चाहत्यांना माहिती दिली. या दोघांनी नुकताच कुटुंबासोबत या खास सोहळ्याचा आनंद लुटला.
पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची लग्नाची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे आता हळहळू केळवणालाही सुरुवात झाली आहे. अमृताच्या आईचे बाबा आणि आजोबांनी या दोघांच्या नात्यासाठी पहिल्या केळवणाचा घाट घातला. यावेळी अमृताने पिवळसर पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तर प्रसादने फिक्या पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दोघंही सोबत खूप गोड दिसत होते. केळवणानंतर त्यांनी कुटुंबासोबत छान फोटोशूटही केलं. त्याचा व्हिडिओ दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘आजोबांनी (आईच्या बाबांनी) वयाच्या ८७व्या वर्षी सगळं प्लॅनींग करून, भेटवस्तू, बुके ह्या सगळ्यांनी सजवून केळवणाला सुरुवात केली. एवढं सगळं झाल्यावर मग “उखाणा घ्या” ह्या ऑर्डरला नाकारणार कसं’ असं कॅप्शन अमृताने व्हिडिओला दिलं आहे.
१८ नोव्हेंबर रोजी अमृता आणि प्रसाद हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. १८ नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद यांच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत. या दोघांच्या लग्नासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. मराठी सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाला उपस्थित असतील अशी शक्यता आहे. ही जोडी सध्या चाहत्यांची लाडकी बनली आहे. त्याच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचं लक्ष असतं. पहिल्या केळवणाचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.