Priyanka Chopra : काही दिवांपूर्वी बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केल्याने प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) चर्चेत आली होती. प्रियांका तिच्या आगमी ‘सिटाडेल’ (Citadel) या वेबसीरिजच्या (Web series) प्रमोशनसाठी प्रियांका भारतात आलेली होती. आता पुन्हा एकदा प्रियांका तिच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत आलेली आहे. महिला आणि पुरुषांचं मानधन समान असावं असं मत प्रियांकाने व्यक्त केलं. एवढंच नाही तर तिला मिळालेल्या यशामुळे काही पुरुषांना असुरक्षित वाटत असल्याचंही ती म्हणाली.
तर काहींना माझ्या यशाचा आनंद होत असल्याचंही तिने आवर्जून सांगितलं.
काय म्हणाली प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा म्हणाली की, “माझ्या यशामुळे काही पुरुषांना असुरक्षित वाटत आहे, तर काही पुरुषांना माझ्या यशामुळे आनंद झालेला आहे. आतापर्यंत पुरुषांना जे स्वातंत्र्य मिळालं त्याचा त्यांनी पुरेपूर आनंद घेतला आहे. भारतात आजही पुरुषप्रधान संस्कृती असल्याने कुटुंबप्रमुखाच्या अधिकाराचाही त्यांनी लाभ घेतला आहे. मात्र, आता एक महिला यश मिळवत आहे, त्यामुळे त्यांच्या स्थानाला धक्का पोहोचत आहे. कारण, जर का ही एक महिला यशस्वी झाली तर इतर महिला तिचं अनुकरण करतील.” एवढंच म्हणून प्रियांका थांबली
नाही, ती पुढे म्हणते की, “महिला कामासाठी बाहेर पडतील आणि पुरुष घरात राहतील अशी भीती त्यांना आहे.” हे सांगतानाच प्रियांकाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवही शेअर केले.
#WATCH | “…I think men have enjoyed freedom & pride of being the breadwinners, the leaders of the family. It is threatening to their territory when a woman does that or if a woman is more successful or if a man is staying at home and a woman goes to work. But we have to teach… pic.twitter.com/jBk4xEjYn2
— ANI (@ANI) April 18, 2023
प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ‘सिटाडेल’या Amazon Prime Video च्या वेब सीरिजमध्ये प्रियांका चोप्रा दिसणार आहे. ही वेब सीरिज 28 एप्रिलला रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने या वेब सीरिजचं मुंबईतही प्रमोशन केलं होतं. त्यावेळी प्रियांकासोबत तिचा नवरा निक जोनास आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासही होती. मालती आणि प्रियांकाने सिद्धीविनायकाला जाऊन दर्शनही घेतले होते.
एवढंच नाही तर फरहान अख्तरच्या जी ले जरा या सिनेमातही कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत प्रियांका झळकणार आहे.या सिनेमाबाबत प्रियांकाने नवीन अपडेटही दिलेले आहे. ती म्हणते, ‘मला वाटते की आलिया, कतरिना आणि मी.. तिघीही त्यांच्या आयुष्यातील सर्वात व्यस्त टप्प्यात आहोत,” पण हा सिनेमा पुढल्या वर्षी येईल अशी आशा तिने व्यक्त केली आहे. सध्या प्रियांका सिटाडेल या तिच्या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.