१४०० कोटींची कमाई करणारा 'पुष्पा २' ओटीटीवर येणार, कधी आणि कोणत्या ॲपवर होणार रिलीज
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच कमाईच्या बाबतीत अव्वल ठरलेल्या ‘पुष्पा २’ चित्रपटाने फार कमी दिवसातच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. ५ डिसेंबरला रिलीज झालेल्या ‘पुष्पा २’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर १२ दिवस झाले आहेत. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू असून चित्रपटाने १२ दिवसांत १४०९ कोटींची कमाई केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणारा ‘पुष्पा २’ चित्रपट आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. पण त्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
रॅपर बादशाहला कार चालवताना ‘ती’ चूक भोवली, भरावा लागला हजारोंचं चलन!
मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा २’ चित्रपट येत्या जानेवारी २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. ‘पुष्पा २: द रुल’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची शक्यता आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मने चित्रपटाचे ओटीटी राईट्स २७५ कोटींना विकत घेतल्याचे बोलले जात आहे. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर, ॲक्शन थ्रिलर ‘पुष्पा २’ चित्रपट नेटफ्लिक्सवर तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. खरंतर कोणताही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ४५ दिवसांनंतर ओटीटीवर रिलीज होतो.
बिग बींनी शेअर केला ‘कभी कभी’च्या शुटिंगच्या दरम्यानचा किस्सा, कपड्यांबद्दलही केला जबरदस्त खुलासा
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ चित्रपट दोन महिन्याच्या आतच ओटीटीवर रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. अद्याप निर्मात्यांकडून चित्रपटाच्या ओटीटी रिलीजच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘पुष्पा २’ ने दोन आठवड्यातच १४०९ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. त्याचवेळी ‘पुष्पा २’ने भारतात १००० कोटींचा गल्ला गाठला आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात कमाईचा वेग मंदावताना दिसत आहे. ‘पुष्पा २’ ने रिलीजच्या दुसऱ्या सोमवारी फक्त २७.७५ कोटींचीच कमाई केली आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या कमाईत ६३.७७ टक्के घट झाली आहे. गेल्या रविवारी चित्रपटाने ७६.०६ कोटींची कमाई केली होती.