(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
ॲमेझॉन एमएक्स प्लेयर या ॲमेझॉनच्या विनामूल्य व्हीडिओ स्ट्रीमिंग सेवेने आज आगामी प्रेम कथेवर आधारित ‘इश्क इन द एअर’ या सिरींजचा ट्रेलर लाँच केला आहे. ‘इश्क इन द एअर’ मध्ये इंदूर आणि मुंबई या दोन परस्परविरोधी शहरांच्या पार्श्वभूमीवर घडणारे कथानक तुम्हाला अनेक परस्पर भेटी, गोड प्रणय, दोन विरोधी जगातील मित्रांची टक्कर पाहायला मिळणार आहे. बीबीसी स्टुडिओज प्रॉडक्शन इंडियाने निर्मित केलेल्या या मालिकेत प्रतिभावान शांतनु माहेश्वरी आणि मेधा राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये इंदूरमधील सर्जनशील आणि मेहनती फोटोग्राफर नमनचे (शांतनु माहेश्वरी) आयुष्य उलगडते, जो त्याच्या कौटुंबिक व्यावसायाच्या यशस्वी साम्राज्यात गुंतलेला आहे. काव्या (मेधा राणा) ही मुंबईतील एक मुक्त, उत्साही हेयरस्टाईलिस्ट आहे. जी स्वतःचा स्वतंत्र मार्ग घडविण्याच्या प्रयत्नात आहे. विमानतळावरील एका आकस्मिक भेटीत नमन आणि काव्या समोरासमोर येतात आणि त्यांच्या प्रणयरम्य प्रवासाला गती मिळते. त्यांच्या जीवनात एक वळण येते. ते त्यांच्या नव्याने सापडलेल्या नात्यात रोमांच शोधतात. नमन आणि काव्या एकमेकांच्या वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीतील अंतर कमी करून त्यांच्यात फुलत असलेल्या प्रेमाचा स्वीकार करणार की नाही हे या सिरींजमध्ये पाहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाविषयी आपले विचार मांडताना, ॲमेझॉन एमएक्स प्लेअरचे हेड ऑफ कंटेंट अमोघ दुसाद म्हणाले, “आमच्या आवडत्या रोमँटिक कंटेंटच्या श्रेणीवर आधारित, इश्क इन द एअर सादर करताना आम्हाला आनंद होतो आहे. ही लक्षवेधी कथा नमन आणि काव्याच्या प्रेममय कथेवर आधारित आहे. एका विमानतळावरील योगायोगाने झालेल्या परस्पर भेटीतून या वावटळीला वेग येतो. जसजसे त्यांचे नशीब एकमेकांत गुंफले जाते, तसतसे प्रेक्षक या जोडीमधील चमकदार केमिस्ट्रीत रमतील. आमच्या प्रेक्षकांसमोर हा आनंददायी प्रणय मांडण्याची उत्सुकता आम्हाला आहे. आमच्या रोमॅंटिक कामावर प्रेक्षकांनी नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला आहे.” असे त्यांनी सांगितले.
नमनची भूमिका साकारणारा शांतनु माहेश्वरी पुढे म्हणाले, “ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर आणखी एक प्रणयरम्य कथा घेऊन परत येताना खूप छान वाटते. ही मालिका प्रेक्षकांना खूप भावेल. इश्क इन द एअर ही एक प्रेमकथा आहे. जी वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या नमन आणि काव्या या दोन व्यक्तींना एकत्र आणते. ते प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात करतात. नमन आणि काव्या, यांच्या प्रेमाचे विमान उंच भरारी घेत असताना, ते जीवनातील चढ-उतारांमधून संबंध आणि भक्तीचा खरा अर्थ शोधून काढतात. ‘इश्क इन द एअर’शी संबंधित संकल्पना आणि पात्रांच्या अस्सल चित्रणाद्वारे प्रेक्षकांच्या मनात एक सूत्र तयार होईल ही आशा आम्हाला वाटते. हो, मी प्रत्येकाचा प्रतिसाद पाहण्यासाठी उत्सुक आहे. हे कथानक अतिशय प्रेमाने तयार करण्यात आले आहे.” असे शांतनुने सांगितले.
या मालिकेत काव्या मेहराची भूमिका साकारताना दिसणाऱ्या मेधा राणाने आपले मत व्यक्त केले ती म्हणाली की, “इश्क इन द एअर ही एक प्रेमकथा आहे. जी प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे. या प्रकल्पावर काम करणे हा खरोखरच एक मजेदार आणि समृद्ध करणारा अनुभव होता. प्रेमाची परिपूर्ण पाककृती कशी अस्तित्वात नाही हे ही कथा दाखवते. प्रेम म्हणजे जे तुम्ही घडवता आणि जरी सर्व प्रतिकूल परिस्थिती तुमच्या विरोधात असली तरी प्रेमाच्या जादूवरचा विश्वास कमी होत नाही. प्रेक्षकही या सिरीजवर तितकंच प्रेम करतील, जेवढं आम्ही ही सिरीज तयार करताना केले होते. मला हा विश्वास आहे.” असे तिने सांगितले.
हे देखील वाचा- करीना कपूरचा ‘द बर्किंघम मर्डर’नंतर ठरणार करिअरमधील ‘हा’ सर्वात मोठा चित्रपट!
‘बीबीसी स्टुडिओज प्रॉडक्शन इंडिया’चे जीएम समीर गोगटे म्हणाले, “इश्क इन द एअर”हे एक आपल्या मातीतील अस्सल प्रणयरम्य नाट्य आहे. जे भारतासारख्या बहुसांस्कृतिक आणि वैविध्यपूर्ण देशातील सर्व गुंतागुंती तसेच सौंदर्यासह आधुनिक प्रेमाचे सार दर्शवते. प्रेक्षकांना या गुंतागुंतीच्या परंतु संबंधित पात्रांचा आणि प्रेमाच्या चढ-उतारांचा शोध लागावा यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ॲमेझॉन एमएक्स प्लेअरसाठी हायवे लव्ह आणि तुझपे मैं फिदा या आमच्या मालिकेच्या यशानंतर, ही सुंदर परंतु अशक्य प्रेमकथा घडविण्यासाठी ॲमेझॉन एमएक्स प्लेअरसह पुन्हा भागीदारी करण्यास आम्ही रोमांचित आहोत. प्रेक्षक या प्रेममय प्रवासात सामील होतील आणि धक्कातंत्राचा आनंद घेतील ही आशा वाटते.” असे त्यांनी सांगितले.
‘इश्क इन द एअर’ चा प्रीमियर 20 सप्टेंबरपासून ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर होणार आहे. जो ॲमेझॉनच्या शॉपिंग ॲपमध्ये, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, स्मार्ट टीव्ही आणि प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.