बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात (Rakul-Jackky Wedding) अडकणार आहेत. हा दोन दिवसीय विवाह सोहळा गोव्यात होणार आहे. या जोडप्याने सुरुवातीला परदेशात डेस्टिनेशन वेडिंगची योजना आखली होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कुटुंबांना भारतातच लग्न समारंभ आयोजित करण्याचे आवाहन केल्यानंतर शेवटच्या क्षणी त्यांनी भारतात लग्न करण्याचा निर्णय घेतला.
[read_also content=”‘भक्षक’चा ट्रेलर रिलीज, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवताना दिसतेय भूमि पेडणेकर! https://www.navarashtra.com/movies/bakshak-trailer-out-bhumi-pednekar-playing-role-of-reporter-nrps-503340.html”]
या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला की, “रकुल आणि जॅकीने सुरुवातीला मध्यपूर्वेत लग्न करण्याची योजना आखली होती. मात्र, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रकुल आणि जॅकीने त्यांच्या मूळ योजनांवर पुनर्विचार केला आणि लग्न भारतात लग्न करण्याचा निर्णय घेतला.
रकुल आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. 19 आणि 20 फेब्रुवारीला या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स होणार असल्याचेही वृत्त आहे.
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचे प्रेमप्रकरण कोणापासून लपलेले नाही. हे जोडपे 2021 पासून एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वी रकुलने तिच्या बॉयफ्रेंड जॅकीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली होती. रकुलने लिहिले होते की, “या वाढदिवसानिमित्त माझ्या प्रेमाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रत्येक दिवशी तुला हवे ते सर्व विपुल प्रमाणात मिळावे अशी माझी इच्छा आहे. या पोस्टमुळे त्यांच प्रेमप्रकरण चांगलच चर्चेत आलं. आता दोघही त्यांच्या नात्याला नाव देण्यास तयार आहेत.