(फोटो सौजन्य - x अकाउंट)
गेल्या काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया ‘इंडियाज गॉट लेटंट’शोमुळे चर्चेत आहे. त्याने शोमध्ये केलेल्या अश्लील टिप्पणीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याने विधानाबद्दल नंतर माफीदेखील मागितली. रणवीरविरोधात देशातल्या अनेक ठिकाणी FIR दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी त्याला अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी रणवीरनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने रणवीरला चांगलंच सुनावलं आहे. शिवाय त्याला काही अंशी दिलासाही दिला आहे.
Sikandar: साजिद नाडियाडवालाच्या वाढदिवशी ‘सिकंदर’चे नवे पोस्टर रिलीज, भाईजानचा नवा लूक चर्चेत!
सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्ट रणवीरला म्हणाले की, रणवीरच्या विरोधात अनेक ठिकाणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकेवरंच सुप्रीम कोर्टाने त्याला नोटीस बजावली आहे. या नोटीशीत जेव्हा केव्हा चौकशीसाठी बोलवले जाईल, तेव्हा त्याला चौकशीसाठी हजर व्हावे लागेल. आतापासून, रणवीर विरोधात त्या विधानासाठी कोणताही नवीन गुन्हा दाखल केला जाणार नाही. रणवीरविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांप्रकरणी त्याला अटकेपासून दिलासा मिळाला आहे. रणवीरला त्याचा पासपोर्ट पोलिस स्टेशनमध्ये जमा करावा लागेल. न्यायालयाच्या परवानगीशिवाय तो देशाबाहेर जाऊ शकणार नाही.
‘प्रेमाची शिट्टी’लंडनमध्ये वाजली… रोमँटिक गाण्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा
जर रणवीरला त्याच्या जीविताला धोका आहे, असं वाटत असेल, तर महाराष्ट्र किंवा आसामच्या स्थानिक पोलिसांकडे तो संरक्षणाची मागणी करू शकतो. रणवीर आणि त्याचे सहकलाकार पुढील सूचना मिळेपर्यंत ‘इंडियाज गॉट लेटंट’ शोची शुटिंग करणार नाहीत. अश्लील कमेंट्स केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबरला फटकारले आहे.. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, तुम्हाला कलेच्या नावाखाली परवाना मिळाला आहे का? त्याची भाषा अपमानास्पद आणि आक्षेपार्ह होती. वकील चंद्रचूड म्हणाले की, एकाच टिप्पणीसाठी वेगवेगळे एफआयआर दाखल करणे हे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, रणवीरला मिळणाऱ्या धमक्यांबाबत, कायदा आपले काम करत आहे. राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करेल.
छावा चित्रपटातील ‘तो’ हृदयद्रावक सीन पाहून रागात प्रेक्षकाने सिनेमाचा पडदाच फाडला
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, तुम्ही बोललेले शब्द पालकांना आणि बहिणींना लाजवेल. संपूर्ण समाजाला लाज वाटेल. ही एक विकृत मानसिकता आहे. रणवीरच्या वकिलाने सांगितले की, त्याची आई डॉक्टर आहे. लोक क्लिनिकमध्ये पोहोचून शिवीगाळ करत आहेत. न्यायालयाने ते लज्जास्पद म्हटले. न्यायमूर्ती एम कोटेश्वर सिंह म्हणाले की, जर पोलिस त्यांना चौकशीसाठी बोलावत असतील तर ते रणवीरला आवश्यक ती सुरक्षा प्रदान करतील. रणवीरने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये हजेरी लावली होती. त्याने एका स्पर्धकाला पालकांच्या जवळीकतेशी संबंधित प्रश्न विचारला होता. रणवीरच्या अश्लील कमेंटची क्लिप व्हायरल होताच त्याला ट्रोल केले जाऊ लागले. या प्रकरणी त्यांनी दोनदा माफी मागितली आहे. पण लोकांचा राग अजूनही कमी झालेला नाही.