ॲमेझॉन प्राइमवरील फर्जी (Farzi) ही ब्लॅक कॉमेडी क्राईम थ्रिलर वेबसिरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता त्याचे चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहिद कपूर, विजय सेतुपती, के के मेनन, राशि खन्ना आणि भुवन अरोरा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 10 फेब्रुवारी 2023 रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर आठ भागांची मालिका होती, जिला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आणि ती सर्वाधिक पाहिली जाणारी भारतीय प्रवाह मालिका बनली. सध्या ‘फर्जी’च्या सिक्वेलची चर्चा जोरात सुरू झाली आहे. आता अभिनेत्री राशि खन्नाने मालिकेच्या शूटिंग आणि रिलीजबाबत मोठं अपडेट दिलं आहे.
[read_also content=”दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयात अल्लू अर्जुनचा मेणाच्या पुतळा, ‘पुष्पा’ स्टाईलमधला फोटो इंटरनेटवर व्हायरल! https://www.navarashtra.com/movies/pushpa-2-the-rule-actor-allu-arjun-launch-his-wax-statue-at-madame-tussauds-dubai-with-iconic-pushpa-pose-pics-518771.html”]
फर्जीमध्ये राशीनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तज्ञ विश्लेषकाची भूमिका केली होती, जी बनावट नोटा ओळखण्यात तज्ञ होती. आता तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की फर्जी 2 चं शूटिंग पुढील वर्षी म्हणजेच 2025 च्या सुरुवातीला सुरू होईल. याच कारण म्हणजे सध्या राज सर आणि डीके सरांकडे खूप काम आहे. त्यांच्याकडे सिटाडेल हनी बनी आणि नंतर द फॅमिली मॅन 3 आहे. त्यानंतर ते बहुधा फर्जी २ मध्ये काम करतील. यासोबतच त्याने ‘फर्जी’मधील आपल्या सहकलाकारांचे कौतुक केलं आणि सांगितले की, शाहिद आणि विजय या दोघांकडून मला खूप काही शिकायला मिळालं.
वेब सिरीजबद्दल बोलायचं तर, राज आणि डीकेची ‘फर्जी’ ही बनावट नोटांवर केंद्रित आहे. या मध्ये शाहिदने सनीची भूमिका साकारली जो त्याच्या आर्थिक संघर्षांवर मात करण्यासाठी, तो त्याचा जिवलग मित्र फिरोज म्हणजेच भुवन अरोरा याच्यासोबत बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी, त्यांना गँगस्टर मन्सूर म्हणजेच केके मेनन आणि पोलीस कर्मचारी मायकल म्हणजेच विजय सेतुपती यांच्या आव्हानांचा सामना करावा लागतो.