रश्मिका मंदान्ना, आलिया भट्ट, कतरिना कैफ, काजोल, सारा तेंडुलकर आणि प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री डीपफेकची शिकार झाली आहे. एकीकडे दिल्ली पोलिसांनी रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपीला अटक केली, तर दुसरीकडे नोराचा डीपफेक व्हिडिओ (Nora Fatehi Deepfake Video) व्हायरल होत आहे. डीपफेकची शिकार झाल्याची माहिती खुद्द नोराने सोशल मीडियावर दिली आहे. तिचा हा फेक व्हिडिओ पाहून नोराला खूप धक्का बसला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
[read_also content=”रश्मिकाचा डिपफेक व्हिडिओ बनवणारा तीन महिन्यानंतर अटकेत, दिल्ली पोलिसांनी आंध्र प्रदेशमधून घेतलं ताब्यात https://www.navarashtra.com/latest-news/delhi-police-arrested-accused-who-made-rashmika-mandanna-deepfake-video-nrps-500149.html”]
नोरा फतेहीने तिच्या इन्स्टाग्राम हँडल स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी एका कंपनीची जाहिरात असल्याचे दिसते. नोराने या जाहिरातीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटसह नोराने लिहिले की, ‘मला धक्का बसला नाही…’. खरी आणि खोटी नोरा आणि जाहिरातीत दिसणारी मुलगी यात फरक करणे तुमच्यासाठी खूप कठीण जाईल. या व्हिडिओतील तिचा आवाजही नोरासारखाच आहे. हा व्हिडिओ पाहून कोणालाच कल्पना आली नाही की ती नोरा नसून दुसरी कोणीतरी आहे. सर्वजण या मुलीला नोरा फतेही समजत होते.






