मुंबई : अभिनेत्री रवीना टंडनचे (Raveena Tandon) वडील आणि चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन(Ravग Tandon) यांचे निधन झालं आहे. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते.रवी टंडन यांनी 70 आणि 80 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले होते. आज (11 फेब्रुवारी) सायंकाळी 4.30 वाजता सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत रवी टंडन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
[read_also content=”कंगना रणौत पुन्हा भडकली, म्हणाली हिंमत असेल तर अफगानिस्तानात… https://www.navarashtra.com/movies/kangana-reaction-on-hijab-controvery-and-afganistan-nrps-236391.html”]
८६ वर्षीय रवी टंडन यांना चालता येत होते, परंतु मागील काही काळापासून त्यांना फुफ्फुसाचा त्रास होता. फुफ्फुसातील फायब्रोसिस नावाच्या आजाराने ते त्रस्त होते. यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. या आजारामुळे त्यांनी आज पहाटे ३.३० वाजता मुंबईतील जुहू येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. रवीना टंडनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या वडीलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या बालपणीचा फोटोसुद्धा आहे. तसेच विविध पुरस्कार सोहळ्यांदरम्यानचे फोटोसुद्धा आहेत. अभिनेत्रीने फोटो शेअर करत एक भावुक पोस्टसुद्धा लिहिली आहे. अभिनेत्रीने पोस्ट करत लिहिलं आहे. ‘तू नेहमी माझ्याबरोबर चालशील, मी नेहमीच तुझी असेन, मी कधीही तुला जाऊ देणार नाही. लव्ह यू बाबा’.
[read_also content=”जिल्ह्यातील कलावंतांच्या भूमिका असलेला जिद्दारी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/maharashtra/jiddari-who-plays-the-role-of-an-artist-from-the-district-visited-the-marathi-film-audience-236320.html”]