फोटो सौजन्य: गुगल
सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांचं प्रेम हे एक समीकरणचं आहे. मात्र काही चाहत्यांच्या अतिप्रेमामुळे अनेकदा सेलिब्रिटींना मन:स्ताप सहन कारावा लागतो. याबाबत नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका चाहत्याच्या अतिप्रेमामुळे सिनेमागृहातील प्रेक्षकांचा जीव धोक्यात आल्याची घटना घडली आहे. तेलुगु सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू याचा 2010 मध्ये आलेला ‘खलेजा’ सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहात रिरिलीज झाला आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी महेश बाबूच्या चाहत्यांनी सिनेमागृहात गर्दी केली होती. याच दरम्यान एका चाहत्याने सिनेमातील सीन रिक्रिएट करण्यासाठी चक्क थिएटरमध्ये साप घेऊन आला होता. त्यामुळे थिएटरमध्ये एकच खळबळ माजली होती.
‘खलेजा’ या सिनेमातील एक सीनमध्ये महेश बाबूच्या हातात साप आहे. हा खोटा साप हातात घेऊन महेश बाबू वाळवंटातून चालत असतो. त्याचवेळी त्याच्यासमोर सिनेमातील व्हिलन येतात आणि त्यांना प्रतिकार करण्यासाठी म्हणून महेश बाबू हातातला खोटा साप व्हिलनच्या अंगावर टाकतो. नेमका हाच सीन एका चाहत्याला रिक्रिएट करण्याचा मोह आवरला नाही आणि हा पठ्ठ्या चक्क खरा साप हातात घेऊन थिएटरमध्ये आला. सिनेमा पाहण्यासाठी आलेला प्रेक्षकांचा सुरुवातीला या पठ्ठ्याच्या हातातला साप खोटा आहे असा समज झाला, मात्र सापाने हलचाल केली तेव्हा थिएटरमधल्या प्रेक्षकांचा एकच गोंधळ उडाला. महेश बाबूच्या या चाहत्याचा अतिप्रेमाने थिएटरमधल्या प्रेक्षकांचा जीव धोक्यात आला होता. ही घटना आंध्रपदेशच्या एका थिएटरमधील असल्याचं म्हटलं जात आहे.
Actor #MaheshBabu mass fans, celebrates the #KhalejaReRelease in Telugu States, by throwing paper cuttings in theatres.
A crazy Mahesh Babu fan took fandom to a wild level on #Khalej4K re-release.
In a viral video a crazy fan was holding a snake inside the fully packed theatre,… pic.twitter.com/dJAir9PwPS— Surya Reddy (@jsuryareddy) May 30, 2025
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या पठ्ठ्याचं अभिनेत्यावर इतकं टोकाचं प्रेम आहे की, हा चाहता सिनेमा पाहण्यासाठी आला तेव्हा, त्या ठराविक सीनमध्ये महेश बाबूने ज्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत या चाहात्याने देखील त्याच रंगाने तसेच कपडे परिधान केले होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. हा पठ्ठ्या थिएटरमध्ये साप घेऊन जातोच कसा ? संबंधित सुरक्षा रक्षकांचा असा हलगर्जीपणा सुरु राहिला तर हे प्रेक्षकांच्या जीवावर बेतणारं आहे. जर सिनेमागृहात कोणाला काही झालं असतं तर याला जबाबदार कोण ? असा सवाल देखील काही युजर्सने उपस्थित केला आहे. अशा या बेजबाबदार आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या चाहत्यांवर वेळीच कारवाई करणं गरजेचं आहे, अशा आशयाच्या कमेंट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.2010 मध्ये गाजलेला हा सिनेमा पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी गर्दी केली होती. मात्र सिनेमातील काही आता वगळण्यात आल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला तर काही जणांनी या रागाच्या भरात थिएटरमध्यो तोडफोड केल्याचं स्पष्ट झालं आहे.