फोटो सौजन्य - Social Media
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर तिचा पती अभिनेता सैफ अली खान आणि मुले तैमूर आणि जहागीर सोबत नियमितपणे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. त्यांच्याबरोबर विविध फोटोज, रिल्स तसेच स्टोरीज पोस्टमार्फत चाहत्यांपर्यत पोहचवत असते. या दरम्यान पती पत्नीने सोबत काम केलेले गाणे ‘दिल हार रे’ पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड पकडले होते. सैफ आणि करीना दोघेही नेहमी पॅप आणि मीडियासमोर येत असतात. यादरम्यान करीना कपूरची मुलाखत चांगलीच गाजत आहे. यात तिने तिच्या नवऱ्याबद्दल म्हणजे सैफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखती दरम्यान तिने तिच्या खाजगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर संवाद साधला आहे.
या मुलाखतीत चर्चा करताना तिने सैफ आणि तिच्या कोणत्या प्रकारचे वाद नेहमी होत असतात यावर दिलखुलास गप्पा केल्या आहेत. ती सांगते कि तिच्या आणि सैफमध्ये एसीच्या तापमानावरून नेहमी वाद होत असतात. सैफला गर्मी जास्त सहन होत नसल्याने त्याला एसी १६ डिग्री सेल्सियसवर ठेवण्याची सवय आहे पण करीना म्हणते कि तिला एसी २० वर हवा असतो. त्यामुळे अनेकदा त्यांच्यात वाद होत असतात. तरी ते दोघे तेरा ना मेरा करत तापमान १९ वर ठेवतात.
या दरम्यान करिनाने किस्सा सांगितला कि जेव्हा आम्ही लोक डिनर करत असतो तेव्हा करिष्मा लपून मुद्दामून एसीचा तापमान २५ करते. तेव्हा अनेकदा सैफने देवाचे आभार मागितले आहेत कि,” देवा तुझे आभार कि माझे लग्न करिष्मासोबत नाही झाले.” करीना म्हणते कि, एकमेकांना जास्त वेळ देता येत नसल्याने कधी कधी त्या दोघांमध्ये चिडचिड होत असते. करीनाला सैफसोबत वेळ घालवायला खूप आवडत असल्याचे करीनाचे म्हणणे आहे.