बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक संजय लीला भन्साळी यांची डेब्यू वेब सिरीज ‘हिरामंडी’ (Heeramandi) बुधवारी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. आज प्रेक्षकांना संजय लीला भन्साळी यांच्या भव्य कलाकृताची आस्वाद घेता येणार आहे. ‘हिरमंडी’च्या फर्स्ट लूकपासून ते टीझर आणि ट्रेलरपर्यंत या वेबसिरिजने यापुर्वीच प्रेक्षकांचं मनं जिकलं आहे. पण हिरामंडीच्या कास्टबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला या अभिनेत्रींना नाही तर काही प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकरांना या वेबसिरीजमध्ये कास्ट करण्याची संजय लीला भन्साळी यांची इच्छा होती अशी माहिती समोर आली आहे.
[read_also content=”महाराष्ट्र दिनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ चित्रपटाची घोषणा, प्रेक्षकांना अनुभवता येणार संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा! https://www.navarashtra.com/movies/sayunkta-maharashtra-movie-announcement-nrps-528813.html”]
‘हिरामंडी’ वेबसिरीजची कथा, संगीत आणि संपूर्ण सादरीकरण खूपच दमदार दिसत आहे. या सर्व गोष्टींसोबतच शोला खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची जबरदस्त कास्टिंग. ‘हिरामंडी’मध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या नावांचा चित्रपटाच्या मूळ कास्टिंगमध्ये समावेश नव्हता.
अलीकडेच लॉस एंजेलिसमध्ये ‘हिरामंडी’चा प्रीमियर झाला, त्यानंतर भन्साळींनी संवादही साधला. Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भन्साळी ‘हिरामंडी’साठी त्यांच्या मनात मूळ भूमिका काय होती हे सांगत आहेत. भन्साळी यांनी सांगितले की, ‘हिरामंडी’ची योजना 18 वर्षांपूर्वी एखाद्या चित्रपटाप्रमाणे होती. ते म्हणाले, ‘हे 18 वर्षांपूर्वी घडले असते तर त्यात रेखा, करीना आणि राणी मुखर्जी असणार होत्या.
भन्साळी पुढे म्हणाले की, जेव्हा त्यांना ‘हिरमंडी’ पुन्हा बनवायचा होता, तेव्हा अनेक पाकिस्तानी कलाकारांची नावे त्यांच्या विचारात होती. नतंर दुसऱ्या कलाकारात घेण्यात आलं. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान इमरान अब्बास आणि फवाद खान यांच्या नावाचा यात समावेश असल्याचही त्यांनी सांगितलं.
‘हिरामंडी’मध्ये सोनाक्षी, मनीषा आणि इतर अभिनेत्री नायकीणच्या भूमिका साकारत आहेत. त्याच्यासोबत फरदीन खानही बऱ्याच दिवसांनी या वेब सीरिजमध्ये कमबॅक करणार आहे. शोच्या पुरुष कलाकारांमध्ये शेखर सुमन आणि अध्यायन सुमन देखील दिसत आहेत. ‘हिरामंडी’ची कथा 1940 च्या स्वातंत्र्यपूर्व भारतातील आहे. या शोचा ट्रेलर गेल्या महिन्यात रिलीज झाला होता आणि भन्साळीचे काम लोकांना एका उत्तम अनुभवासाठी उत्सुक असल्याचे दिसते.