फोटो सौजन्य - Social Media
बहुप्रतीक्षित ‘मुफासा: द लायन किंग’चा दुसरा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. तो ट्रेलर पाहून प्रेक्षकांना रिलीजपूर्वीच चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. डोळे दीपवणाऱ्या अप्रतिम दृश्यांसह आणि उत्कंठावर्धक कथानकाने या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बार्री जेनकिन्स दिग्दर्शित चित्रपटात हिंदी डब्ड व्हर्जनसाठी मोठ्या कलाकारांचा सहभाग असल्याने भारतीय चाहत्यांमध्ये विशेष उत्साह आहे. या चित्रपटात शाहरुख खानने हिंदी व्हर्जनमधील ‘मुफासा’ या व्यक्तिरेखेला आपला आवाज दिला आहे. शाहरुखच्या आयुष्याशी साधर्म्य असलेली ‘मुफासा’च्या संघर्षाची आणि मेहनतीची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अलीकडेच शाहरुखने एका व्हिडीओद्वारे ‘मुफासा’ व्यक्तिरेखेसोबत कशा पद्धतीने साधर्म्य आहे, याबद्दल सांगितले आहे.
पुरुषोत्तम बेर्डे यांना विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’
‘डिज्ने स्टुडिओज’च्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. ‘मुफासा: द लायन किंग’ चित्रपटात ‘मुफासा’चा प्रवास दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याला अनाथ सिंह म्हणून त्याची ओळख मिळते आणि तो जंगलाचा राजा बनतो. शाहरुख खानने ‘मुफासा’चा संघर्ष आपल्या आवाजाने जिवंत केला आहे. शाहरुख खानचे ‘मुफासा’ व्यक्तिरेखेसोबत कशा पद्धतीने साधर्म्य आहे, हे सांगताना अभिनेता म्हणतो, “ज्याप्रमाणे मुफासाने आपल्या मेहनतीतून आणि संघर्षातून जंगलाचा राजा बनण्याचा अधिकार मिळवला, त्याचप्रमाणे त्यानेही अनेक अडचणींनंतरही भारतीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला.”
मुफासा आणि शाहरुख यांच्यात खूप खोलवरचे नाते आहे, ज्यात त्याचा लहान सिंहापासून राजा बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. शाहरुखलाही करिअरच्या सुरुवातीला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला, पण सतत केलेल्या प्रयत्नांतून तो इंडस्ट्रीतला बादशाह बनला. मुफासा या व्यक्तिरेखेत शाहरुखला त्याच्या जीवनातला संघर्ष आणि त्याच्या यशाची झलक पाहायला मिळते. चित्रपटात रफीकी नावाच्या पात्राने मुफासाच्या संघर्षाची कहाणी मांडली आहे. चित्रपटात मुफासाचा प्रवास दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये मुफासाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि शेवटी तो जंगलाचा राजा बनतो.
दरम्यना हा चित्रपट प्रेक्षकांना २० डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, किंग खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, शाहरुख खान लवकरच ‘किंग’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करत आहेत. या चित्रपटात सुहाना खान आणि अभिषेक बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत.